मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षानुवर्षे तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळाला प्रत्यक्ष मैदानात उतरून आधार दिला आहे. एखाद्या महामंडळात किंवा एखाद्या विभागात काय चमत्कार होऊ शकतो, हे राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने दाखवून दिले आहे. देशामध्ये फक्त सहा राज्यांमधील एसटी महामंडळे ही फायद्यात चालली असून उर्वरित सर्व तोट्यात सुऊ आहेत. मुळात एसटी महामंडळ हे स्वतंत्ररित्या चालणारे महामंडळ असल्याने सरकारकडून काही वेळा त्यांना आर्थिक मदत केली जात असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सामंत म्हणाले की, मागील 2 ते 4 वर्षांत कोविड काळात लक्ष न दिल्याने हे महामंडळ तोट्यात चालले होते. अगदी कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतके देखील एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीतून महामंडळाला सावरणे, ही मोठी कसरत होती. पण अशा बिकट परिस्थितीतून शिंदे फडणवीस व पवार सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीरीत्या बाहेर काढले. वर्षानुवर्षे तोट्यात असलेले एसटी महामंडळ नफ्यात आणून, सक्षम व सकारात्मक पद्धतीने काम करण्याची इच्छा असेल तर एखाद्या तोट्यात असलेल्या संस्थेचाही कायापालट करता येतो, हे राज्यातील शिंदे‚फडणवीस‚ पवार सरकारने दाखवून दिले असल्याचे विधान शिवसेनेचे उपनेते सामंत यांनी केले.
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात एसटी तोट्यात
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात एसटीचा तोटा अधिकाधिक वाढत चालला होता. कोविड काळात तर एसटीचं 6300 कोटींचं उत्पन्न बुडाले होते. एसटी कर्मच़ाऱ्यांचे पगार देखील थकले होते. तेव्हा सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आर्थिक मदत द्यावी लागत होती. पूर्वीच्या सरकारमध्ये असताना अजित पवार अर्थमंत्री असताना महिना 300 कोटी ऊपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. एसटी महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला होता. परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर, मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारने 75 वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला. त्याची भरपाई सरकारकडून एसटी महामंडळाला 100 कोटी ऊपये देण्यात आले. तसेच महिलांना एसटी प्रवासामध्ये तिकीट दरांमध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णयाने महामंडळाला सरकारकडून परिपूर्तीसाठी 180 कोटी ऊपये देण्यात आले.
1) महामंडळ 10 ते 12 हजार कोटी ऊपयांनी नफ्यात
2) महामंडळाने 150 इलेक्ट्रिक बसेस तसेच भौगोलिक परिस्थितीनुसार सातारा व रत्नागिरी जिह्यात 50-50 मिनी बसेस,
3) एसटीकडे 16 हजार 233 गाड्या आहेत. यापैकी 10 वर्षांपेक्षा जास्त जुन्या नऊ हजार 758 गाड्या
4) एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा भत्ता 42 टक्क्यांनी वाढवून भत्ता 12, 500 ऊपये