Tarun Bharat

#INDvsENG सूर्यकुमार तळपला; भारताचा ८ धावांनी विजय

ऑनलाईन टीम

भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या चौथ्या टी20 सामन्यात भारताने इंग्लंडला परााभूत केेले. त्यामुळे २-२ पदार्पणाच्या सामन्यातच सूर्यकुमार यादवने विक्रमी खेळी केली. पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सूर्यकुमारने 31 चेंडूत 57 धावांची ( 6 चौकार, 3 षटकार) तुफानी खेळी केली. त्यामुळे भारताने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 185 धावा फटकावल्या.

सामन्यातील आदिल रशीदच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत रोहित शर्माने इरादा स्पष्ट केला. पहिल्या षटकात रोहित-राहुलच्या जोडीने 12 धावा वसूल केल्या. रोहित 12 धावांवर खेळत असताना आर्चरने त्याला झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला प्रारंभ केला. जोरदार फटकेबाजी करत पहिल्याच टी20 सामन्यात अर्धशतक साकारले. के.एल. राहुल 14 धावांवर परतला. कर्णधार विराट कोहलीही 1 धाव काढून परतला. रिषभ पंतने 23 चेंडूत 30 धावा जमवल्या. श्रेयस अय्यरने 18 चेंडूत एक षटकार आणि 5 चौकारांच्या बळावर 37 धावा जमवल्या. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली.

इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 4 बळी टिपले. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 बाद 185 धावा केल्या.

दरम्यान, नाणेफेक जिंकून इंग्लंडने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुखापतग्रस्त ईशान किशनच्या जागी सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. तर, फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलच्या जागी जलदगती गोलंदाज राहुल चहर संघात आला आहे. इंग्लंडने संघात कोणताही बदल केला नाही.

Related Stories

इशान, चहर ठरले ‘मिलियन डॉलर बेबी’!

Patil_p

डीव्हिलियर्सचा ‘स्ट्रेट ड्राईव्ह’ अन् आयफोन ‘क्लीन बोल्ड’!

Amit Kulkarni

चौरंगी जिम्नॅस्टिक स्पर्धा टोकियोत

Omkar B

हॉकी फायनल न झाल्यास दोन्ही संघांना सुवर्ण

Patil_p

सुमित नागल मुख्य ड्रॉमध्ये

Patil_p

अर्थाचा अनर्थ….

Patil_p