राजस्थानमध्ये बीएसएफची कारवाई
श्रीगंगानगर / वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानने आपल्या नापाक कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. पश्चिम राजस्थानमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील श्रीगंगानगर जिह्यात एका पाकिस्तानी नागरिकाने भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला ठार केले. घुसखोराची ओळख अद्याप पटलेली नाही. बीएसएफने घुसखोराचा मृतदेह श्रीगंगानगर पोलिसांच्या ताब्यात दिला. बीएसएफ आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे डीआयजी अमित त्यागी आणि इतर वरि÷ अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
घुसखोरीच्या प्रयत्नाची ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीगंगानगर जिल्हय़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनुपगढ भागात बॉर्डर पोस्ट क्रमांक 372 येथे पाकिस्तानी घुसखोराने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे पहारा देणाऱया बीएसएफ जवानांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. पण जवानांच्या इशाऱयाला दाद न देता घुसखोर भारताच्या हद्दीत घुसला. इशारा देऊनही न थांबल्यामुळे जवानांनी त्याच्या दिशेने गोळीबार करत त्याला ठार केले. संबंधित घुसखोर 25-26 वर्षीय असल्याचे सांगण्यात येत आहे. ठार झालेल्या घुसखोराची ओळख अद्याप पटलेली नाही.