गावठी मिरची ग्राहकांना झोंबली, प्रति किलो रु. 1 हजार दर, आंबा 250 ते 300 रु.प्रति डझन


प्रतिनिधी /पेडणे
पेडणेत पुरुमेताच्या तयारीसाठी भरलेल्या गुरुवारच्या आठवडा बाजारात ग्राहकांना गावठी मिरची बरीच झोंबली. सकाळीच बाजारपेठेत गर्दी होती. मात्र प्रत्येक वस्तूंचे दर हे महाग असल्याने ग्राहकांच्या चेहऱयावर नाराजी दिसत होती. मिरची प्रति किलो 1000 रुपये दराने विकली गेली तर टोमेट 60 रुपये किलो तर कांद्याची 20 रुपये दराने विक्री झाली. तसेच आंबा 250 ते 300 रुपयाने डझन विक्री झाला.
दरवषी गोव्याच्या विविध भागातून तसेच महाराष्ट्रातून आणि कर्नाटकच्या बेळगाव भागातून पेडणे बाजारपेठत मिरची येते. यंदा मात्र वाढत्या महागाईमुळे पुरुमेताची तयारी करण्यासाठी बाजारपेठत आलेल्या ग्राहकांच्या चेहऱयावर नाराजी दिसून आली. गावठी मिरची दरवषी मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेत येत होती. मात्र यंदा काही हाताच्या बेटावर मोजता येणाऱया विपेत्यांकडेच उपलब्ध होती. त्याचे दर 800 ते 1000 रुपये असल्याने ग्राहकांना ती खरेदी करताना ती तिखट लागत होती. महाराष्ट्र, बेळगाव तसेच अन्य भागातून आलेली मिरची ही 700 ते 800 रुपये दराने विकली गेली.
खराब हवामानाचा मिरचीला फटका
यंदा पाऊस तसेच वातावराणात झालेला बदला याचा परिणाम मिरची तसेच अन्य पिकांवर झाला. खराब वातावरणामुळे यंदा मिरची पीक सर्वत्र कमी आले. याचा परिणाम म्हणून मिरचीचा दर वाढल्याचे विक्रेत्यांकडून बोलले जात आहे. दरवषी मे महिना जवळ आला की पावसाळय़ात पुरुमेत करण्यासाठी बाजारातील मिरची तसेच गावठी कडधान्य मोठय़ा प्रमाणात येत असे. यंदा मात्र पावसामुळे या सर्व पिकावर त्याचा परिणाम दिसून आला. वाढलेल्या दरामुळे मिरची गोरगरीब जनतेला विकत घेणे शक्मय नसल्याच्या प्रतिक्रिया यावेळी नागरिकांकडून ऐकायला मिळाल्या.
आंबा, काजू पिकांवरही परिणाम
हवानाम बदलचा परिणाम काजू तसेच आंबा पिकावरही झाला. त्यामुळे दर वषी विविध उत्पन्न घेणारे शेतकरी हवालदिल झाले. दर वषी एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात मानकुराद आंबे तसेच हापूस आंबे महाराष्ट्रातून पेडणे बाजारपेठेत दाखल होतात. यंदा मात्र एकच व्यक्ति आणि तेही कच्चे आंबे घेऊन बाजारात बसलेली दिसून आली. त्यामुळे यंदा गरीब जनतेला आंबा खाणे कठीण होऊन बसले.
सायंकाळी पुरुमेत बाजारावर पावसाचा व्यत्यय
गुरुवारी सकाळपासून पेडणे तालुक्मयात ढगाळ वातावरण होते. त्यातच सायंकाळी 4 नंतर पावसाची रिपरीप सुरु झाली. त्यामुळे पुरुमेताचा भरलेला बाजार ओस पडला. विपेत्यांनी आपल्या वस्तू तसेच विक्रीसाठी आणलेले साहित्य प्लास्टिक आच्छादने घालून झाकून ठेवले. सायंकाळी ग्राहकही किरकोळ स्वरुपात बाजारात आले. त्यामुळे पावसाचा फटका विपेत्याना बसला.