Tarun Bharat

आगामी काळात महागाई कमी होणार

अन्नधान्ये, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल स्वस्त होणे शक्य 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

येत्या काही महिन्यांमध्ये भारतात महागाई कमी होण्याची शक्यता आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगातही महागाईच्या झळांची तीव्रता कमी होणार आहे, असे अर्थतज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. येत्या सहा ते आठ महिन्यात महागाई कमी होऊ शकते आणि आगामी दोन वर्षांमध्ये महागाईत मोठी घट होऊ शकते असा अनेक सर्वेक्षण संस्थांचा निष्कर्ष आहे.

पुढच्या वर्षी, अर्थात मार्च 2023 पासून कच्चे इंधन तेल, नैसर्गिक वायू, खाद्यतेल, कापूस आणि विविध धातू यांचे दर कमी होऊ लागतील. या सर्व वस्तंचे भाव 15 टक्के कमी होण्याची दाट शक्यता आहे. कच्चे तेल स्वस्त झाल्यास अनेक वस्तूंचे भाव कमी होऊ शकतात. सध्या कच्चे इंधन तेल आणि नैसर्गिक वायू यांचे दर गगनाला भिडल्याने जगभरात महागाई वाढली आहे.

सध्या कच्च्या इंधन तेलाचा भाव 90 डॉलर्स प्रतिबॅरलच्या आसपास आहे. मात्र, आगामी काही महिन्यांमध्ये तो 75 डॉलर्सच्या आसपास स्थिरावेल, अशी शक्यता भारतीय वस्तूव्यवहार तज्ञांनी व्यक्त केली. खाद्यतेलाचे तर 12 ते 15 टक्के कमी होऊ शकतात. युपेन या देशाकडे सूर्यफुलाच्या तेलाचा मोठा साठा आहे. युद्ध परिस्थिती निवळल्यास हा साठा जगासाठी उपलब्ध होऊ शकतो. श्रीलंकाही लवकरच पाम तेलाची निर्यात सुरु करणार आहे. त्यामुळे दर उतरण्याची शक्यता आहे. देशात यंदा मोहरीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होणार असल्याने तेलाचे विविध प्रकार उपलब्ध होतील. याचा परिणाम म्हणून दर कमी होतील असे अनुमान आहे. खाद्यतेल स्वस्त झाल्यास सर्वसामान्यांची सोय होणार आहे.

अन्नधान्यांचे उत्पादन वाढणार

यंदा रब्बी हंगामात गहू आणि मक्याचे उत्पादन वाढेल असे मत भारतीय कृषीतज्ञांनी व्यक्त केले आहे. गव्हाचे उत्पादन 12 ते 14 टक्के वाढू शकते. मक्याचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणात वाढण्याचे अनुमान आहे. जगभरात कापसाचे उत्पादन वाढण्याची चिन्हे आहेत. भारतात कापसाचे उत्पादन 9 टक्क्यांनी वाढू शकते. अमेरिकेत ते मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. भारतात कापसाच्या बाजारपेठेत सध्या मोठी हालचाल दिसून येते. अधिक पीक बाजारात आल्यास दर उतरणार असून एकंतर नजीकच्या भविष्यकाळात सर्वसामान्यांच्या दृष्टीने काहीतरी लाभदायक घडणार असल्याचे हे संकेत आहेत. अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून तिच्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे, असे तज्ञांचे प्रतिपादन आहे.

Related Stories

यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Patil_p

शेतकरी, कष्टकऱयांना सुजलाम् सुफलाम् कर!

Patil_p

युद्धस्मारक ठिकाणी हुतात्मा पित्याला वाहिली श्रद्धांजली

Patil_p

Paytm चे CEO विजय शेखर शर्मा यांची जामिनावर सुटका

Archana Banage

सांबा : लष्कराच्या छावणीजवळ 4 संशयित ड्रोनचा वावर

datta jadhav

केदारनाथ मंदिराजवळ हिमस्खलनाची घटना

Patil_p