Tarun Bharat

विविध समुदायांचा मतदारसंघांवरील प्रभाव

गुजरातमध्ये अनेक समुदायांचे लक्षणीय प्रमाण

गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष हे जाती तसेच विविध समुदायांच्या मतपेढींवर नजर केंद्रीत करून आहेत. भाजप, काँग्रेस, आप किंवा एआयएमआयएम कुठलाही पक्ष असो, सर्वांनी विशिष्ट मतपेढीला डोळय़ासमोर ठेवून प्रचार चालविला आहे. गुजरातमध्ये सत्ता मिळविण्यासाठी पाटीदार, कोळी, अहीर, ब्राह्मण आणि ठाकोर समवेत अन्य समुदायांची मते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. यातील कुठलाही समुदाय नाराज झाल्यास पक्षाच्या उमेदवारांच्या अडचणी वाढू शकतात. याचमुळे राजकीय पक्षांनी सामाजिक राजकारण समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बोलले जाते.

पाटीदार समुदाय ः गुजरातच्या राजकारणात पाटीदार नेहमीच एका महत्त्वाच्या भूमिकेत राहिले आहेत. हा समुदाय स्वतःला भगवान रामाचा वंशज मानतो. सौराष्ट्राच्या 11 जिल्हय़ांसह सूरतमध्येही या समुदायाचा मोठा प्रभाव आहे. राज्यातील 48 मतदारसंघांचा निकाल ठरविण्यात या समुदायाची मोठी भूमिका असते.

प्रजापती समुदाय ः या समुदायाचा प्रभाव राज्यातील 42 मतदारसंघांवर आहे. या समुदायाची लोकसंख्या सुमारे 55 लाखांच्या आसपास आहे.

कोळी समुदाय ः राज्यातील 45 मतदारसंघांचा निकाल हा समुदाय निश्चित करत असल्याचे मानले जाते. गुजरातच्या किनारी भागात हा समुदाय एकवटलेला आहे.

जैन समुदाय ः राज्यात अत्यंत कमी लोकसंख्या असलेला हा समुदाय आहे. जैन समुदायाचे मतदार 10-15 मतदारसंघांमध्ये लक्षणीय संख्येत आहेत. हा समुदाय सधन असल्याने याचा समाजावर मोठा प्रभाव आहे.

क्षत्रिय समुदाय ः या समुदायाचा 9 मतदारसंघांवर चांगलाच प्रभाव आहे. या समुदायाशी संबंधित करणी सेनेने स्वतःच्या संख्येच्या आधारावर सौराष्ट्र, उत्तर गुजरात, मध्य आणि दक्षिण गुजरातसह एकूण 42-30 मतदारसंघांवर क्षत्रिय उमेदवार देण्याची मागणी केली होती.

अहीर समुदाय ः या समुदायाच्या मतदारांची संख्या 6 मतदारसंघांमध्ये निर्णाय स्वरुपाची आहे.

ब्राह्मण समुदाय ः ब्राह्मण समुदायाचे मतदार 4-5 मतदारसंघांमध्ये लक्षणीय संख्येत आहेत.

ठाकोर समुदाय ः उत्तर गुजरातमध्ये ठाकोर समुदायाने भाजपकडून 10 तर काँग्रेसकडून मेहसाणा समवेत 8 जागांवर उमेदवारी मागितली होती. या समुदायाचा 25 मतदारसंघांवर निर्णायक प्रभाव आहे.

अन्य समुदाय ः अन्य छोटय़ा समुदायांमध्ये वंजारा, माळी, भोई, राणा, खारवा, मेर, वाघेर या जातीचे लोक सामील आहेत. हे समुदायदेखील कुठल्याही उमेदवाराच्या विजय-पराभवात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

Related Stories

भारताच्या अफगाणिस्ताला साहाय्यावर पाकिस्तानच्या अटी

Patil_p

अदानी लॉजिस्टिक्सची नवकारकडून 835 कोटी रुपयांना कंटेनर डेपोची खरेदी

Patil_p

केबल चोरीप्रकरणी हवालदार अटकेत

Patil_p

भारतात मागील 24 तासात 37,148 नवे कोरोना रुग्ण, 587 मृत्यू

datta jadhav

माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची हत्या

datta jadhav

चौथ्या शनिवारी सुटी न घेणाऱया सरकारी कर्मचाऱयांना 15 दिवस प्रासंगिक रजा

Patil_p