Tarun Bharat

महिलांना १ रूपयात १० सॅनिटरी नॅपकिन

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती, 15 ऑगस्टपासून सुरु होणार योजना, दारिद्रय रेषेखालील व बचत गटाच्या महिलांना मिळणार लाभ

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

मा†सक पाळी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून दा†रद्रय रेषेखालील व बचत गटाच्या महिलांसाठी 1 रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. या योजनेसाठी 200 कोटी रुपये खर्च येणार असून त्याचा राज्यातील 60 लाख महिलांना फायदा होणार आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व जागतिक प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळी दरम्यान काळजी न जगभरातील आठ लाख माहिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच राज्य सरकारने दारिद्रय रेषेखालील माहिलांसाठी नाममात्र किमतीत नॅपकिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

सध्या राज्यातील ग्रामीण भागातील बचत गट व आरोग्य विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेतही सॅनिटरी नॅपकिन देण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी वगळून ही योजना राबवली जाणार आहे. गाव स्तरावरच बचत गटाकडून ही सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी केली जातील. जिथे हे शक्य नाही तिथे दर करार करून खरेदी केली जाईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गाव स्तरावर मशीन बसवण्यात येणार आहे. या मशीन जिल्हा परिषद, पंचायत समिती ,ग्रामपंचायत तसेच शासकीय निधी व सीएसआर निधीतून बसवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

योजनेचे स्वरूप
60 लाख लाभार्थी
1 रुपयात मिळणार 10 सॅनिटरी नॅपकिन
योजनेवर 200 कोटी खर्च अपा†क्षत
बचत गटाकडून करणार उत्पादन
आशा, सेविका, उपकेंद्राकडून पुरवठा
सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट व्यवस्था

error: Content is protected !!