बैठकीत जिल्हाधिकाऱयांचे आवाहन, स्वतंत्र ऍपच्या माध्यमातून माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
‘पुण्यकोटी दत्तक योजने’ची माहिती नागरिकांना पुरविण्यासाठी स्वतंत्र ऍप तयार करण्यात आले आहे. खासगी व सरकारी गोशाळेतील जनावरांना दत्तक घेण्यासाठीची ही योजना असून जिह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱयांना केली आहे. जिल्हाधिकाऱयांनी स्वतः एक गाय दत्तक घेऊन इतरांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंबंधी जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सर्वसामान्य नागरिकांना गायी व इतर जनावरांना सहजपणे दत्तक घेता यावे यासाठी पुण्यकोटी दत्तक योजना सरकारने सुरू केली आहे. नागरिक किंवा संस्था, संघटनांनी जनावरे दत्तक घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले.
सध्या जिह्यातील 13 गो शाळेत 1226 गायी व इतर जनावरांची पुण्यकोटी दत्तक योजनेसाठी नोंदणी झाली आहे. वार्षिक 11 हजार रुपये भरून 28 जनावरांना दत्तक घेण्यात आले आहे. या योजनेतून 3 लाख 47 हजार देणगी जमविण्यात आली आहे. एक प्राणी तीन महिन्यांसाठी दत्तक घेण्यासाठी 2 हजार 500 रुपये, सहा महिन्यांसाठी 5 हजार 500 रुपये व वर्षाला 11 हजार रुपये ठरविण्यात आले आहेत.
पुण्यकोटी योजनेसाठी सुरू असलेल्या स्वतंत्र ऍपमध्ये जनावरांच्या छायाचित्रांसहीत माहिती देण्यात आली आहे. या ऍपच्या माध्यमातून माहिती घेऊन पशुसंगोपन खात्याच्या जिल्हा व तालुका कार्यालयांना भेटी देऊन दत्तक प्रक्रिया पूर्ण करता येते. या योजनेत सर्व सरकारी गो-शाळांचा समावेश करावा. बेळगाव महानगरपालिकेच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या गो-शाळांचाही समावेश करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिली.
बेळगावात कुत्र्यांसाठी स्वतंत्र पार्क उभारण्यासंबंधी योजना तयार करण्यात येत आहे. श्वान प्रदर्शन, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार व त्यांना दत्तक घेण्यासाठीही यामुळे अनुकूल होणार आहे. वैज्ञानिकरित्या सुसज्ज असे श्वान पार्क उभारण्यात येणार आहे. देशभरात सध्या कार्यरत असलेल्या श्वान पार्कचा अभ्यास करून योजना तयार करण्याची सूचना मनपाच्या अधिकाऱयांना करण्यात आली.
पशु वैद्यकीय सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. राजीव कोले, प्राणीदया संघटनेचे सदस्य राजेंद्र कटारीया, जगदीश हिरेमठ, मनपा आयुक्त डॉ. रुदेश घाळी, पालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱयांनी के. के. कोप्प येथील महावीर गो-शाळेतील एक गाय स्वतः दत्तक घेतली. नागरिकांनीही यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
मांसविपेत्यांनी परवाना घ्यावा
शहर व उपनगरांत सुरू असलेले बेकायदा कत्तलखाने बंद करण्यात यावेत. नियमानुसार परवाना देणे शक्मय असल्यास त्यांना परवाना द्यावा, अशी सूचना पालिकेच्या अधिकाऱयांना करण्यात आली. शहरातील मांसविक्री करणाऱया दुकानदारांनी ट्रेड लायसन्स घेणे सक्तीचे आहे. जर लायसन्स शिवाय दुकाने सुरू असतील तर ती बंद करण्यात यावीत. मांसविपेत्यांनी आपल्या दुकानांना पडदे लावणे सक्तीचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना सांगितले.