प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी भटकी जनावरे फिरत आहेत. कणबर्गी परिसरात जखमी गाय असल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन महापालिकेच्या कर्मचाऱयांच्यावतीने सदर गायीला श्रीनगर येथील गो-शाळेत दाखल करण्यात आले.
भटक्मया जनावरांची संख्या वाढल्याने ती पकडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र कणबर्गी परिसरातील खुल्या जागेत जखमी गाय असल्याची माहिती महापालिकेकडे देण्यात आली. त्यामुळे पशुसंगोपन विभागाचे राजू संकण्णावर मनपा कर्मचाऱयांसह कणबर्गी येथे दाखल झाले. सदर गायीच्या पायाला जखम झाल्याचे निदर्शनास आले. तात्काळ त्या गायीला महापालिकेच्या वाहनातून श्रीनगर येथील गो-शाळेत आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱयांना सूचना देऊन उपचार करण्याची विनंती करण्यात आली.