Tarun Bharat

न्यूझीलंडचा अष्टपैलू ग्रॅण्डहोमला दुखापत

Advertisements

वृत्तसंस्था/ लंडन

न्यूझीलंड क्रिकेट संघातील अष्टपैलू कॉलीन डी ग्रॅण्डहोमला दुखापत झाल्याने त्याला इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार आहे.

लॉर्डस् मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटीतील खेळाच्या तिसऱया दिवशी गोलंदाजी करताना ग्रॅण्डहोमच्या पायाच्या टाचेला दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. तथापि या मालिकेतील उर्वरित सामन्यासाठी ग्रॅण्डहोम उपलब्ध राहणार नाही, असे क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने सांगितले. इंग्लंडने पहिली कसोटी जिंकताना न्यूझीलंडचा 5 गडय़ांनी पराभव केला होता. आता न्यूझीलंड संघामध्ये ग्रॅण्डहोमच्या जागी अष्टपैलू मिशेल ब्रेसवेलचा समावेश करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारपासून ट्रेंटब्रिज मैदानावर उभय संघातील दुसऱया कसोटीला प्रारंभ होणार असून ही मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत खेळविली जात आहे.

Related Stories

महिला क्रिकेटपटू अन्शुला राववर डोपिंगमुळे चार वर्षांची बंदी

Patil_p

विजयी चौकार फटकावण्याचे आरसीबीचे लक्ष्य

Patil_p

10 हजार मीटर्समध्ये इथिओपियाचा बरेगा अजिंक्य

Patil_p

कनिष्ठ महिला हॉकी संघाची विजयाने दौऱयाची सांगता

Patil_p

ब्रिटनचा डेन इव्हान्स विजेता

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया यांचे 3 टी-20 सामने सप्टेंबरमध्ये

Patil_p
error: Content is protected !!