Tarun Bharat

बेंगळूरमध्ये राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक, दोन गट भिडले

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर बेंगळूरमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान शाईफेक करण्यात आली. यानंतर टिकैत यांच्या समर्थकांनी शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पकडले. त्यावेळी स्थानिक नेते कोडिहल्ली चंद्रशेखर आणि टिकैत समर्थक भिडले. हाणामारी करत त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

कोडिहल्ली चंद्रशेखर यांचे कर्नाटकातील स्थानिक वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यामध्ये चंद्रशेखर हे पैशांची मागणी करताना दिसत होते. या व्हिडिओवर स्पष्टीकरण देण्यासाठी टिकैत यांनी बेंगळूरच्या प्रेस क्लबमधील गांधी भवनात पत्रकार परिषद घेतली होती. चंद्रशेखर यांना कोणत्याही परिस्थितीत आमचा पाठिंबा नसून, शेतकऱ्यांना धोका करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी टिकैत या पत्रकार परिषदेतून करणार होते. त्याचवेळी टीकैत यांच्यावर एकाने काळी शाई फेकली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. स्थानिक शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांच्या समर्थकाने ही शाईफेक केली असून, त्याला टीकेत यांच्या समर्थकांनी पकडून चोप दिला. शाई फेकणाऱ्याचे नाव अद्याप समोर आले नाही.

त्यानंतर टीकैत यांना चंद्रशेखर यांच्याबद्दल माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले, माझं चंद्रशेखर यांच्याशी काहीच देणंघेणं नाही. चंद्रशेखर फ्रॉड आहे. त्याच्या समर्थकांपैकी एकानं माझ्यावर शाईफेक केली. शाईफेक झाल्याने माझे समर्थक भडकले. त्यांनी शाई फेकणाऱ्याला पकडलं. त्यावेळी चंद्रशेखर आणि टिकैत समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. घोषणाबाजी करत त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. दरम्यान, स्थानिक पोलिसांकडून मला कोणतीही सुरक्षा पुरवली गेली नाही. सरकारच्या संगनमताने ही शाईफेक झाली, अशी टीकाही त्यांनी यावेळी सरकारवर केली.

Related Stories

‘पॅन’-‘आधार’ला लिंक न केल्यास होणार 10 हजार दंड

tarunbharat

सुशांत आत्महत्या : तपास सीबीआयकडे; पार्थ पवार म्हणाले…

Tousif Mujawar

चोवीस तासात देशात 27 हजार नवे रुग्ण

Patil_p

अभूतपूर्व वीज संकटाची चाहूल

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; दोघांचा मृत्यू

Patil_p

वरिष्ठ कमांडरसह दोघांचा खात्मा

Patil_p
error: Content is protected !!