सातारा प्रतिनिधी
पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वेळे गावच्या हार्दिक खंबाटकी बोगद्यात सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कारचा अपघात झाला या अपघातात कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत खंबाटकी बोगद्यामध्ये पुणे बाजूकडे निघालेले इनोव्हा कार अपघातग्रस्त झाली ही कार कर्नाटक येथील गोकर्ण महाबळेश्वर येथून दर्शन घेऊन पुण्याबाजुकडे निघाली होती पहाटे साडेपाचच्या सुमारास कार वरील चालकाचा ताबा सुटल्याने जोरदार असा अपघात झाला कार मध्ये सात जण प्रवास करत होते त्यामध्ये दोन महिला जागीच मृत्यू झाला त्यांची नावे रंजना सराफ आणि शांताबाई जाधव अशी आहेत जखमी पाच जणांमध्ये दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले जखमींना उपचारासाठी रुग्णाला थांबवण्यात आले इनोव्हा कार ही खंबाटकी बोगद्याच्या प्रवेशद्वारावर कठड्याला धडकली.मृत पावलेल्या दोघी मायलेकी आहेत.या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे..