Innova car overturned due to burst tire on Zarap-Patradevi bypass
मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर टायर फुटल्याने इनोव्हा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले. बाबल गावडे व विठ्ठल केदार (दोघेही राहणार आजगाव ) अशी त्यांची नावे आहेत. कार पलटी होऊन देखील त्यांना मोठी दुखापत झाली नाही. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास अपघात झाला.
बाबल गावडे व विठ्ठल केदार हे आपल्या ताब्यातील इनोव्हा कारने ओरोस येथे जात होते. झाराप पत्रादेवी बायपासवरून जात असताना नेमळे येथील नवीन स्वामी समर्थ मठाजवळ गाडीचा टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. सुदैवाने या अपघातात दोघांनाही मोठी दुखापत झाली नाही.
अपघातानंतर मळगांव येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी व संजय जोशी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींची विचारपूस केली. यानंतर त्या ठिकाणी अन्य ग्रामस्थ उपस्थित झाले त्यानंतर जखमींना उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले.
सावंतवाडी / प्रतिनिधी