मुंबई
आयनॉक्स विंडची सहकारी कंपनी आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस आपला आयपीओ दाखल करणार आहे. सदरच्या आयपीओतून 740 कोटी रुपये उभारण्याची योजना कंपनीची असून याकरिता परवानगीसाठी सेबीकडे रितसर अर्ज सादर केला असल्याची माहिती आहे. आयपीओ अंतर्गत 370 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर केले जाणार असून प्रवर्तकांतर्फे 370 कोटी रुपयांच्या इक्विटी समभागांची विक्री ऑफर फॉर सेल अंतर्गत केली जाणार आहे.