नागरिकांची सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्याकडे मागणी : कोट्य़वधीचा घोटाळा झाल्याचा आरोप : सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून संगनमताने भ्रष्टाचार
प्रतिनिधी/कोल्हापूर
ग्रामपंचायत शिरोली पुलाची, ता. हातकणंगले येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱयांनी संगनमताने केलेल्या कोटय़वधींच्या भ्रष्टाचाराची व बेकायदेशीर कामांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, आम्ही सदर गावचे नागरिक म्हणून ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती घेतली असता आम्हाला ग्रामपंचायत कारभारामध्ये गैरव्यवहार असल्याचे निदर्शनास आले आहे व त्याची खात्रीही झाली आहे. माहितीच्या अधिकाराखाली मागितलेल्या ग्रामपंचायतीच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली असता, ग्रामपंचायतीमध्ये अनेक बाबतीत मोठा भ्रष्टाचार व बेकायदेशीर कामकाज झाल्याचे निदर्शनास आले आहे.
विद्यमान सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकाजयांनी अधिकारांचा गैरवापर करून त्यांना स्वतःला किंवा त्यांच्या आप्तस्वकियांना आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतूने अनेक गोष्टींमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. जिल्हा परिषदेकडून ब्लॅक लिस्टेड ठेकेदाराला कामे देऊन आर्थिक हित साधून घेणे, अतिरिक्त कर्मचारी खर्च, औषध फवारणी अशा गोष्टींमध्ये भ्रष्टाचार केला असून या सर्वांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, पेठवडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतिश पाटील, उद्योजक कृष्णात करपे, दीपक यादव, डॉ. सुभाष पाटील, सलिम महात, दिलीप कौंदाडे, राजहंस पाटील, धनाजी पाटील आदी उपस्थित होते.
रस्त्यावर मुरुम टाकण्यासाठी 3 वर्षात 15 लाख 9 हजार खर्च
रस्त्यांसाठी लागणारा मुरूम कागदोपत्री दाखवून 3 वर्षांत 15 लाख 9 हजार 27 इतके रुपये उचलले आहेत. दिवाबत्तीची व सादिलवार खरेदीमध्येही विना ‘जीएसटी’ची खोटी बिले कागदोपत्री दाखवून 3 वर्षांमध्ये 28 लाख 11 हजार 302 रुपयांचे धनादेश काढले आहेत, तसेच डागडुजीच्या नावाखालीही लाखोंची डुप्लिकेट बिले दप्तरी दाखवून मोठय़ा रकमा काढलेल्या आहेत.
कचरा, शौचालय कामातही घोटाळा
ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या गाडय़ा असूनही घनकचजयाच्या उठावासाठी भाडय़ाच्या बोगस गाडय़ांचा वापर दाखवून गावात कोठेही न झालेल्या कामांची मागील 3 वर्षांमध्ये जवळपास 23 लाख 51 हजार 497 रुपयांची खोटी, बोगस व्हाऊचर तयार करून बिले काढली आहेत. तसेच कचरा व्यवस्थापनासाठी जेसीबीचा वापर वारंवार दाखवून 26 लाख 37 हजार 633 रुपयांचे बेकायदेशीर धनादेश काढले आहेत. शौचालय मैला उपशाचे कामही वारंवार केल्याचे दाखवून एकाच व्यक्तीच्या नावे मोठय़ा रकमेचे धनादेश काढले आहेत.