मांस विपेत्यांसह सर्वच व्यावसायिकांकडे पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील मांस विपेत्यांना व्यवसाय परवाना सक्तीचा करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी बजावला आहे. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांकडील परवाना तपासणी मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. मांस विपेत्यांसह सर्वच व्यावसायिकांकडे परवान्याची विचारणा करून नोटीस बजाविण्याचा सपाटा मनपाने सुरू केला आहे.
महापालिकेच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी विविध विकासकामांचा आढावा घेऊन विनापरवाना मांस विपेत्यांची माहिती घेण्याचा आदेश महापालिका प्रशासनाला बजावला होता. याची दखल घेत मांस विपेत्यांसह सर्वच प्रकारच्या व्यावसायिकांकडील परवान्याची तपासणी करण्याचा आदेश महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी बजावला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने प्लास्टिकविरोधी मोहीम आणि स्वनिधी योजनेंतर्गत अर्ज भरून घेण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र आता ही मोहीम थांबविण्यात आली असून सोमवारपासून व्यवसाय परवान्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
शहर आणि उपनगरांतील प्रत्येक व्यावसायिकांकडे परवान्याची विचारणा करण्यात येत आहे. परवाना असल्यास नूतनीकरण केला आहे का? याची चाचपणी करण्यात येत आहे. जर नूतनीकरण केला नसल्यास त्याबाबत व्यावसायिकांना सूचना करण्यात येत आहेत. तसेच विनापरवाना व्यावसायिकांना नोटीस बजावून तातडीने परवाना घेण्याची सूचना केली जात आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून व्यवसाय परवानासाठीचे अर्ज वितरित करण्यात येत आहेत. व्यवसाय परवाना तातडीने घ्यावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात येत आहे.
प्लास्टिकविरोधी मोहीम थंडावली
व्यवसाय परवाना तपासणी मोहीम सुरू करण्यात आल्याने प्लास्टिकविरोधी मोहीम थंडावली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक बंदी राबवून सिंगलयूज प्लास्टिक हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. पण परवाना तपासणी मोहिमेमुळे सिंगलयूज प्लास्टिक हद्दपार कसे होणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.