आकर्षक किल्ल्यांच्या प्रतिकृती : हलत्या देखाव्यांचा माध्यमातून शिवरायांच्या इतिहासाची मांडणी पाहून कौतुक
प्रतिनिधी /बेळगाव
दिवाळीनिमित्त दरवषी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती सर्वत्र उभारण्यात येतात. ही परंपरा अनगोळ येथे यंदाही जपली गेली आणि एकापेक्षा एक आकर्षक किल्ले उभारण्यात आले आहेत. या हुबेहूब साकारण्यात आलेल्या प्रतिकृतींना शिवप्रतिष्ठानचे सांगली कार्यवाह राजू पुजारी यांनी आवर्जून भेट दिली.
यावेळी त्यांनी रघुनाथ पेठ येथील शिवनेरी युवक मंडळाने सादर केलेल्या किल्ले गोवळकोंडा व हलत्या देखाव्याला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दक्षिण दिग्विजयप्रसंगी गोवळकोंडय़ात दिलेल्या भेटीचा हलता देखावा, येसाजी कंक यांची हत्तीशी झुंज देतानाच्या देखाव्याच्या माध्यमातून शिवरायांच्या इतिहासाची केलेली मांडणी पाहून कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
यावेळी बेळगाव जिल्हाप्रमुख किरण गावडे, विश्वनाथ पाटील यांनीही देखावा पाहून कार्यकर्त्यांना शाबासकी दिली. याप्रसंगी मंडळास स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी गजानन निलजकर यांनी 32 मण सुवर्णसिंहासन व दुर्गराज रायगडावर खडा पहारा या संदर्भात माहिती दिली. यावेळी आकाश मुतकेकर, संदीप सुंकद, विनायक केदार, सुमित राघोजी, सोहम शिंत्रे, मंथन यळ्ळूरकर, सुशांत लंगरकांडे, अनंत मुंगळे, सदानंद यळ्ळूरकर, रितेश पाटील, भावेश बिर्जे, सचिन मांगले, विठ्ठल सातेरी, प्रणय यळ्ळूरकर तसेच मंडळाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
लोहार गल्ली, अनगोळ येथील युवकांनी विश्वकर्मा मंदिर येथे किल्ले सिंहगडाची प्रतिकृती तयार केली आहे. याठिकाणीही शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन किल्ल्याची माहिती घेतली. यावेळी विशाल लोहार, विवेक लोहार, विनायक नरोटे, नितीन तहसीलदार, श्री तहसीलदार, विनायक लोहार, आकाश सुनगार, कल्लप्पा अंगडी, हरीश लोहार, सचिन कलखांबकर, तसेच गल्लीतील युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भांदूर गल्ली, अनगोळमध्ये लोहगडाची प्रतिकृती
भांदूर गल्ली, अनगोळ येथील हनुमान व्यायाम शाळा यांच्यावतीने लोहगडाची प्रतिकृती तयार केली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने या प्रतिकृतीला भेट देऊन या युवकांनाही सन्मान चिन्ह देण्यात आले. हा किल्ला साकारण्यासाठी राहुल शिंदोळकर, अजित आरेर, कार्तिक बेळगावकर, वल्लभ कंग्राळकर, साईश शिंदोळकर, श्रीशा कोचेरी, आराध्या कोचेरी आदींनी परिश्रम घेतले.
सिद्धिविनायक मंदिर, शिवशक्तीनगर येथील युवकांनी किल्ले जंजिराची प्रतिकृती तयार केली आहे. या किल्ल्याला सन्मानचिन्ह देऊन या मुलांचे कौतुक केले. हा किल्ला बनविण्यासाठी विघ्नेश गुंजटकर, यशराज गुंजटकर, अरु सुपन्नावर, दिगंबर धुडूम, तरुण सुपन्नावर, प्रफुल्ल काकतकर, सुजित सातेरी, साईराज जाधव, गौरव देसाई, भावेश गोटी, गुरुप्रसाद बोरकन्नवर, ओंकार पाटील यांनी सहभाग घेतला आहे.
यावेळी शिवप्रतिष्ठानचे शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, सांगली कार्यवाह राजू पुजारी, किरण बडवाण्णाचे, गजानन निलजकर, रोहित भादवणकर, नितीन कुलकर्णी, अतुल केसरकर तर अनगोळ विभागातून जीवन झंगरुचे, ओमकार चौगुले, गजानन चौगुले, विनायक राऊळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.