रुंदी वाढविण्याची बार असो.अध्यक्षांकडून सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात प्रवेश करताना पूर्वी जे गेट होते ते काढून नव्याने गेट उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र आता देखील ते गेट लहान होत असल्याचे वकिलांना दिसून आले. त्यामुळे हे वृत्त ‘तरुण भारत’मधून प्रसिद्ध होताच बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी आणि इतर पदाधिकाऱयांनी शुक्रवारी पाहणी करून संबंधित कंत्राटदाराला गेटची रुंदी वाढविण्याची सूचना केली आहे.
जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात अनेक न्यायालये आहेत. त्या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. नवीन न्यायालयेही स्थापन केली जात आहेत. इमारतीही वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या न्यायालयाच्या आवारात मोठी वर्दळ होत आहे. मात्र प्रवेशद्वारच अत्यंत लहान असल्यामुळे एकाचवेळी दोन वाहने ये-जा करणे अवघड जात आहेत. याचबरोबर त्या ठिकाणी बऱयाचवेळा वाहतुकीची कोंडी होत आहे.
आता त्या ठिकाणी नव्याने संरक्षण भिंत व गेटची उभारणी करण्यात येत होती. मात्र नवीन गेटची रुंदीदेखील कमी होती. वकिलांच्या लक्षात ही बाब आली. याबाबत तातडीने त्यांनी तक्रार केली होती. त्यामुळे शुक्रवारी अध्यक्ष
ऍड. प्रभू यत्नट्टी, जनरल सेपेटरी गिरीराज पाटील, माजी उपाध्यक्ष ऍड. अण्णासाहेब घोरपडे, ऍड. श्रीधर मुतकेकर, ऍड. मारुती कामाण्णाचे, ऍड. सावंत, ऍड. प्रमिळा हंपण्णावर, ऍड. देसाई यांनी पाहणी केली. तसेच कंत्राटदाराला गेटची रुंदी वाढविण्याची सूचना केली आहे.