मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारतीसाठी निधी मंजूर करून देणार- मंगला अंगडी
वार्ताहर/किणये
सोनोली येथील प्राथमिक मराठी शाळेची पाहणी खासदार मंगला आंगडी यांनी शुक्रवारी केली. शाळेची इमारत मोडकळीस आली होती. या इमारतीची पाहणी करून इमारतीसाठी निधी मंजूर करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विनय कदम, नारायण झंगरूचे आदी उपस्थित होते. खासदार मंगला अंगडी व विनय कदम यांचा एसडीएमसी अध्यक्ष यल्लाप्पा झंगरूचे, उपाध्यक्ष चित्रा कित्तुरकर आदींच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उमेश झंगरुचे, राजू झंगरुचे, संदीप पाटील, प्रकाश पाटील, सागर झंगरुचे, अशोक कडोलकर, भाऊराव झंगरूचे, ग्रामपंचायत अध्यक्ष हेमा हदगल, बाळू लोहार, रवळू पाटील, दीपा लोहार, दत्तोपंत पाटील, गुरनाथ झंगरुचे, अमोल जाधव, संजय पाटील, बंडू कुदेमनीकर, मोहन तलवार, सुभाष हादगल, देवाप्पा शिंदे, रवळू चव्हाण, शिवाजी मरोळकर, गुणवंत सुतार आदींसह या भागातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.