प्रतिनिधी /सांगे
पावसाळय़ात खाणींवरील खंदकांपासून कोणतीही आपत्ती ओढवू नये यासाठी सांगेचे उपजिल्हाधिकारी पांडुरंग ताळगावकर तसेच मामलेदार राजेश साखळकर यांनी सांगे तालुक्मयातील विविध अशा खंदकांची पाहणी केली. सरकारने खाण लीजधारकांना नोटिसा पाठवून लीज क्षेत्रातील यंत्रे, प्लांट आदी सामग्री बाहेर काढण्यास सांगितले आहे. त्यामुळे खाण कंपन्यांकडून यंत्रसामग्री हलविणे जोरात चालू आहे. परिणामी खंदकांतील पंप हलविल्यानंतर पाण्याची पातळी वाढून धोका निर्माण होऊ शकतो हे जेव्हा लक्षात आले तेव्हा सरकार खडबडून जागे झाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिकाऱयांची बैठक घेऊन त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने वरील पाहणी करून खाण अधिकाऱयांकडून वस्तुस्थिती जाणून घेण्यात आली. आज सोमवारी पुन्हा सरकारी अधिकाऱयांची बैठक होणार आहे. यासाठी खाण खात्याकडून एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती देखरेख ठेवणार आहे. सांगे तालुक्मयात काले, सावर्डे, उगे, भाटी, रिवण, कुर्डी या पंचायत क्षेत्रांत खाण खंदक आहेत.
वास्तविक सांगे भागात बऱयाच खंदकांतून आपोआप पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था असल्याने तशी धोकादायक स्थिती नाही. परंतु 6 जूननंतर खाण व्यवस्थापनांचा ताबा राहणार नसल्याने सरकारने सुरक्षेची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत या भागातून व्यक्त होत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खाणींवर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात या मागणीने सध्या जोर धरला आहे. वरील पाहणीच्या वेळी उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार यांच्याबरोबर त्या त्या क्षेत्रातील तलाठी दामोदर नाईक, नरेश नाईक, प्रीतेश नाईक, श्याम वाडकर, सुमेधा गावकर, सर्कल निरीक्षक प्रदीप गावकर, खाण अधिकारी इत्यादी हजर होते.