Tarun Bharat

महिलेच्या कहाणीतून मिळणार प्रेरणा

Advertisements

एक हात, अर्धे पाय तरीही जगभ्रमंती

माणसाला दोन पाय आणि दोन हात असतात. जीवन जगण्यासाठी आम्हाला या अवयवांची गरज असते. परंतु आमच्या या विशाल आकाराच्या जगात काही लोक या महत्त्वपूर्ण अवयवांशिवायच जन्मले आहेत. यापैकी काही जण अत्यंत निराश होऊन जगत असतात. परंतु काही लोक या दिव्यांगत्वावर मात करत स्वतःचे जीवन मोकळेपणाने जगतात. असे लोकच पूर्ण जगभरासाठी प्रेरणास्रोत ठरत असतात. पूर्ण हात-पाय नसूनही स्वतःला निराशेत न बुडवून घेणाऱया महिलेची ही कहाणी आहे.

कॅनडात राहणाऱया चार्लीचा जन्म एक हात आणि अर्ध्या पायांसोबत झाला होता. तिच्या आई कमी वयात गरोदर राहिली होती. तिच्या आईने गर्भपाताचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. माझे पालन-पोषण सामान्य मुलांप्रमाणेच झाले मला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता जाणवली नाही. परंतु किशोर वयात येताच गोष्टी बदलल्या, मी सर्वसामान्य मुलींसारखी राहू शकत नव्हते आणि स्वतःच्या शरीरातील उणीवा जाणवू लागल्या. मी डेटिंग करू शकत नव्हते, तसेच माझा कुठलाच बॉयप्रेंड नव्हता असे चार्ली सांगते.

माझ्यासाठी हायस्कुल, कॉलेजची वर्षे आव्हानात्मक होती. परंतु आता मी स्वतःचे जीवन मोकळेपणाने जगतेय आणि कुठल्याच गोष्टीची आता चिंता नाही, पूर्ण जगाची भ्रमंती करण्याची इच्छा असल्याचे चार्लीने सांगितले. 25 वर्षीय चार्ली सदैव हसतमुख दिसून येते आणि स्वतःचे प्रत्येक स्वप्न ती पूर्ण करत आहे.

निवडला स्वतःचा मार्ग

कॉलेजमधील काळ अत्यंत संघर्षपूर्ण होता असे तिचे सांगणे आहे, परंतु आता ती एक यशस्वी रेडिओ होस्ट ठरली असून जगभ्रमंती करत आहे. आतापर्यंत तिने मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, आणि ब्रिटनला भेट दिली आहे. ज्या ज्या ठिकाणी गेले तेथे चांगले लोक भेटले. लोकांनी नेहमीच मदत केल्याचे तिने म्हटले आहे. चार्लीचे स्वतःचे सोशल मीडिया अकौंट असून तेथे स्वतःच्या ट्रिपमधील छायाचित्रे आणि चित्रफिती अपलोड करत असते आणि लोकांची त्यांना मोठी पसंती मिळते.

Related Stories

युएईत विदेशी पर्यटकांना प्रवेश मिळणार

Patil_p

कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होणे अशक्य : WHO

datta jadhav

मेक्सिको : 1 लाख बळी

Omkar B

कोलंबिया : सीमा बंदच

Patil_p

ज्युलियन असांजचे होणार अमेरिकेकडे प्रत्यार्पण

Patil_p

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर

datta jadhav
error: Content is protected !!