Tarun Bharat

इंटरपोल लोगोकरता ‘सूर्य मंदिरा’कडून प्रेरणा

90 व्या अधिवेशनाचे भारतात होणार आयोजन

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराच्या रथाच्या चाकांनी प्रेरित आकृती इंटरपोलच्या 90 व्या अधिवेशनाचा लोगो असणार आहे. यासंबंधीची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. पुढील महिन्यात होणाऱया या अधिवेशनात 195 देशांचे अधिकारी भाग घेणार आहेत. महाअधिवेनशाचे आयोजन करणाऱया सीबीआयने लोगोचे अनावरण केले असून यात तीन पानांची एक वर्तुळाकार आकृती असून मध्ये ‘चाक’ असल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.

इंटरपोलचे 90 वे अधिवेशन 18 ऑक्टोबरपासून नवी दिल्लीत सुरू होणार आहे. इंटरपोलसोबत संपर्क साधण्यासाठी सीबीआय भारताची राष्ट्रीय यंत्रणा आहे. सीबीआयने ओडिशातील नक्षीदार सूर्य मंदिरापासून प्रेरणा घेत या अधिवेशनाचा लोगो तयार करविला आहे.

भारताने यापूर्वी 1997 मध्ये अशाप्रकारच्या अधिवेशनाचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नांमुळे देशाला पुन्हा अधिवेशनाचे आयोजन करण्याची संधी मिळाली असल्याचे अधिकाऱयाने म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 30 ऑगस्ट 2019 रोजी इंटरपोलचे तत्कालीन महासचिव जुर्गन स्टॉक यांच्यासोबतच्या बैठकीत अधिवेशनाच्या आयोजनाची इच्छा व्यक्त केली होती.

18 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया 3 दिवसीय अधिवेशनात भ्रष्टाचार, सायबर गुन्हे, इंटरनेटवर प्रसारित होणारी बाल लैंगिक शोषण सामग्री, बेपत्ता व्यक्ती आणि  दहशतवादासह जगभरातील फरार गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी विविध देशांच्या पोलिसांदरम्यान सहकार्यात सुधार करण्यासाठी नवे तंत्रज्ञान अन् व्यवस्थांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

Related Stories

पदवी विद्यार्थ्यांना जुलैमध्ये लस

Patil_p

नव्या नवेलीने सुरू केली आणखी एक संस्था

Patil_p

पंजाब : शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत आमदार नवज्योत सिद्धू यांनी घरावर फडकावला काळा झेंडा

Tousif Mujawar

काश्मीरबाबत चर्चेस पाकिस्तान तयार : जनरल बाजवा

Abhijeet Khandekar

सेन्सेक्सची प्रथमच 55,000 अंकांवर झेप

Patil_p

महिला कैद्यांना मंगळसूत्र घालता येणार

Patil_p
error: Content is protected !!