म्हापसा : खोब्रावाडा कळंगूट येथील श्री बाबरेश्वर समाज हनुमान मंदिर ट्रस्टतर्फे श्री हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा 27 मार्च रोजी पुरोहित यशवंत केळकर व शास्त्री श्रीपाद जोशी यांच्या अधिपत्याखाली साजरा होत आहे. सोमवार दि. 27 रोजी यजमान सौ. व श्री. यशवंत बाबुलो कांदोळकर यांच्याहस्ते सकाळी 9 वा. प्राकार स्थळ, शुद्धी, मुख्य देवता पूजन, माऊती मधुपर्क पूजन, छोटी माऊती स्थापना, सकाळी 11.10 शुभमुहुर्तावर माऊती स्थिर प्रतिष्ठापना, मुख्य देवता माऊतीची महापूजा, प्रासारउत्सर्ग, क्षेत्रपाल बलिदान, पूर्णाहुती, आरती, सार्वजनिक गाऱ्हाणे, ब्राम्हण संभावना आशीर्वाद, दुपारी महाप्रसाद होईल. दि. 28 रोजी सायंकाळी सद्गुरू आशीर्वचन सोहळा, पद्मश्री विभूषित, सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, अध्यक्ष भाजप गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार मायकल लोबो, कळंगूट सरपंच जोसेफ सिक्वेरा आदी मान्यवर उपस्थित राहतील. रात्री 7 वा. तालचक्र निर्मित नहुष लोटलीकर, मुग्धा गांवकर साइनेकर (गायिका), तुकाराम बिटये गोवेकर (तबला), सुनाद कोरगावकर (हार्मेनिअम), सागर पेडणेकर (मंजीरी) यांचा ‘स्वर स्मरण’ यांची संगीत मैफील होईल. बुधवार दि. 29 रोजी रात्री 8 वा. कला चेतना वळवई निर्मित आणि विश्वनाथ कुर्डीकर प्रस्तुत दोन अंकी कोकणी विनोदी नाटक ‘शित थंय भूता’ सादर होईल. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री बाबरेश्वर समाज हनुमान मंदिर ट्रस्ट खोब्रावाडातर्फे करण्यात आले आहे.
Previous Articleगोव्यात राजकीय आरक्षण न देणे हा ‘एसटी’ समाजावर अन्याय
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.