साहित्य
१ वाटी तांदूळ
बारीक चिरलेली हिरवी मिरची
बारीक चिरलेली कोथिंबीर
१ चमचा जिरे
चवीनुसार मीठ
२ छोटे उकडलेले बटाटे
पाणी
तळण्यासाठी तेल
कृती
सर्वप्रथम एक वाटी तांदूळ ३ तास पाण्यामध्ये भिजत ठेवा.यानंतर ते तांदूळ मिक्सर मध्ये वाटून घ्या. त्याचबरोबर उकडलेले बटाटे मिक्सरला वाटून घेऊन ते तांदळाच्या पिठात मिक्स करा. जर पीठ घट्ट असेल,तर भजीच्या बॅटरप्रमाणे त्यात थोडे पाणी घालून पीठ तयार करून घ्या.आणि हाताने एकाच दिशेने फेटून घ्या यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर,मिरची,आणि जिरे घाला. यानंतर तेल गरम करून त्यात भजी सोडा. आणि मंद आचेवर तळून घ्या. गरमागरम तांदळाची कुरकुरीत भजी खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

