Tarun Bharat

Kolhapur : ‘हायब्रीड ऍन्युटी’अंतर्गत मंजूर रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करा

आमदार प्रकाश आबिटकर यांचे निर्देश; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसोबत बैठक

कोल्हापूर प्रतिनिधी

दळणवळणाच्या सुविधा चांगल्या प्रकारच्या उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या ‘हायब्रीड ऍन्युटी हॅम’ अंतर्गत निपाणी-देवगड, कुर-शेळेवाडी, परिते ते वाशी असे पॅकेज नं. 47 व 48 असे दोन रस्ते मंजूर होवून 4 वर्षे उलटली आहेत. तरी अद्याप या रस्त्यांची कामे पुर्ण झालेली नाहीत. यामुळे नागरीकांची गैरसोय होत असून ही कामे तात्काळ पुर्ण करा, असे निर्देश आमदार प्रकाश आबिटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता एस.पी.कुंभार यांना दिले.

कोल्हापूरात सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय येथे राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील बांधकाम विभागाच्या प्रलंबित कामांबाबत आयोजित बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी अधिक्षक अभियंता एस. पी. कुंभार, राधानगरीचे माजी उपसभापती अरुणराव जाधव, माजी सरपंच सागर धुंदरे, कार्यकारी अभियंता प्रविण जाधव, उपअभियंता राधानगरी एस. बी. इंगवले, उपअभियंता भुदरगड श्री.मिरजकर, अभियंता आजरा राजेंद्र सावंत, उपकार्यकारी अभियंता संजय माने, विजय बलुगडे आदी उपस्थित होते.

आमदार आबिटकर म्हणाले की, ‘हायब्रीड ऍन्युटी हॅम’ अंतर्गत निपाणी-देवगड, कुर-शेळेवाडी, परिते ते वाशी असे पॅकेज नं.47 व 48 असे दोन रस्ते मंजूर आहेत. या रस्त्याचे काम करणाया कंपनीने कामास केलेल्या दिरंगाईमुळे रस्त्याचे काम अद्याप अपुर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरलेले आहे. यासाठी संबंधीत कंपनीला रस्त्याची कामे वेळेत करण्यासाठी वेळेची मर्यादा देऊन काम पुर्ण करणे गरजेचे असून त्याबाबतच्या सुचना कंपनीस द्याव्यात.

परिते ते राधानगरी व कूर ते गडहिंग्लज या रस्त्यांच्या कामाला निधी मंजूर असून तात्काळ या रस्त्यांची कामे सुरू करावीत. राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील तहसील इमारत, प्रांत कार्यालय, सोळांकूर उपजिल्हा रुग्णालय या इमारतींची कामे तात्काळ सुरू करावीत. तसेच आजरा व कसबा तारळे उपजिल्हा रुग्णालय कसबा तारळेचे इमारत बांधकाम अंदाजपत्रक शासनाकडे प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी पाठवण्यात यावे, राधानगरी व आजरा क्रिडा संकुलाचे देखील काम जलद गतीने सुरू करावे, अशा सुचना आमदार आबिटकर यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या.

रस्त्यावरील खड्डे भरा, अन्यथा अधिकार्यांवर कारवाई
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले असून खड्डे देखील प्रचंड प्रमाणात पडलेले आहेत. यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत असून तात्काळ या रस्त्यावरील खड्डे भरावेत अन्यथा संबंधीत अधिकायांवर कारवाई करावी, असे निर्देश आमदार आबिटकर यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.

Related Stories

शिरोळ तालुक्यातील कुटवाडातून विवाहिता बेपत्ता

Archana Banage

अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन अत्याचार,तरुणास अटक

Archana Banage

ठाकरेंच्या हाकेनंतर शिवसैनिक आक्रमक;संजय मंडलिकांसह दोन जिल्हाप्रमुख ऍक्टिव्ह

Abhijeet Khandekar

Kolhapur; पालेश्वर धरणात बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद, ८५ बंधारे पाण्याखाली

Archana Banage

Sangli; एक कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलिस जॉन तिवडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Abhijeet Khandekar