Tarun Bharat

तालुक्यात ‘हर घर तिरंगा’साठी पीडीओंना सूचना

Advertisements

तालुका पंचायतमध्ये पीडीओंची बैठक : विविध विषयांवर चर्चा : अधिकाऱयांनी ध्वज शिलाई करणाऱया महिलांकडून जाणून घेतली माहिती

प्रतिनिधी /बेळगाव

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. दि. 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस तिरंगा फडकवायचा आहे. त्यामुळे याकडे आता मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी तालुका पंचायतमध्ये पीडीओंची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

आता तालुक्मयातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी तालुका पंचायतच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. तालुका पंचायतच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली. यावेळी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांनी वरील आवाहन केले आहे. याचबराब्sार जिल्हा पंचायतीचे द्वितीय श्रेणी अधिकारी आणि तालुका पंचायतचे सहाय्यक सचिव राजेंद्र मोरबद व्यासपीठावर होते.

नुकतीच सांबरा व हलगा येथील ध्वज शिलाई करणाऱया महिलांकडून माहिती जाणून घेण्यात आली होती. तर हे ध्वज तातडीने शिलाई करून 13 ऑगस्टपर्यंत प्रत्येकाच्या घरावर फडकले पाहिजे, तसेच आतापर्यंत किती ध्वज शिलाई करण्यात आले आहेत आणि प्रत्येक ग्राम पंचायतीला किती ध्वज पोहोचले आहेत? याबाबत पिडीआंsशी चर्चा करण्यात आली.

अभियान यशस्वी करण्यासाठी ग्राम पंचायतमधील पीडीओ व कर्मचाऱयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावून देशाबद्दलचे प्रेम दाखविण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे. अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र तीन दिवस ‘हर घर तिरंगा’ अभियान केंद्र सरकारने राबविण्याचे आदेश दिले आहेत. हे आम्ही सर्वांनी पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. याचबरोबर उद्योग खात्री योजनेंतर्गत कोणकोणती विकासकामे राबविण्यात येत आहेत आणि जे आराखडा पाठवून देण्यात आले आहेत, त्यांना तातडीने मंजुरी देण्यात येईल. याचबरोबर इतर विकास कामांकडेही लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली. दरम्यान जलजीवन मिशन योजना यशस्वी करण्यासाठी अजूनही काही ग्राम पंचायत दुर्लक्ष करत आहेत. परिणामी याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. तेंव्हा ही योजना 100 टक्के पूर्ण करा, असे आवाहनही दनवाडकर यांनी केले.

करवसुलीचे काम त्वरित हाती घ्या

सध्या तालुक्मयातील करवसुली मोठय़ा प्रमाणात थकीत आहे. ती वसूल करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे आता तातडीने करवसुलीचे काम हाती घ्यावे आणि तो कर सरकारजमा करावा, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी तालुक्मयातील पीडीओ, क्लार्क व ग्राम पंचायतचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

20 वर्षांपासून राजहंसगडावर एकच पॅनेलची बाजी

Patil_p

जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी सुवासिनींनी घातले साकडे

Omkar B

दीड क्विंटल अमली पदार्थ केले नष्ट

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट निवडणूक जुलैमध्ये शक्य

Patil_p

कुद्रेमनी ग्रामस्थांची अडवणूक करु नका

Rohan_P

निपाणी पालिकेला विविध मागण्यांचे निवेदन

Patil_p
error: Content is protected !!