Tarun Bharat

हुतात्मा स्मारकाचे पूर्णतः राष्ट्रीय युद्ध स्मारकाशी एकत्रिकरण

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात असणारे हुतात्मा सैनिकांचे स्मारक आता पूर्णतः राष्ट्रीय युद्ध स्मारक परिसरात स्थापित करण्यात आले आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारक नव्यानेच स्थापन करण्यात आले आहे. हे स्मारक स्थापन झाल्यानंतर तेथे इंडिया गेट परिसरात असणाऱया हुतात्मा स्मारकाचा पुष्कळसा भाग हलविण्यात आला होता. शुक्रवारी हुतात्मा स्मारकात असणारी रायफल आणि सैनिकाचे हेल्मेटही राष्ट्रीय युद्ध स्मारक परिसरात नेण्यात आले आहे. अशाप्रकारे आता पूर्वीचे हुतात्मा स्मारक आणि नवे राष्ट्रीय युद्ध स्मारक यांचे एकत्रिकरण झाले आहे. एका शानदार समारंभात शुक्रवारी हे एकत्रिकरण करण्यात आले. भूसेना, वायुसेना आणि नौसेना या तीन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

हुतात्मा स्मारकात असणारी अमर जवान ज्योती व इतर काही भाग यापूर्वीच नव्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या परिसरात नेण्यात येऊन तेथे विधिवत स्थापन करण्यात आला होता. मात्र, रायफल आणि हेल्मेट नेण्यात आले नव्हते. आता तेही इंडिया गेट परिसरातून नव्या परिसरात नेण्यात आले आहे. ही रायफल आणि हेल्मेट हे 1971 मध्ये पाकिस्तानविरोधात झालेल्या युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे प्रतीक मानण्यात येत होते. आता ही रायफल आणि हेल्मेट नव्या राष्ट्रीय युद्ध स्मारक परिसरातील परमवीर चक्र विजेत्या सैनिकांच्या प्रतिमांमध्ये स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती संरक्षण विभागाने दिली.

नव्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा परिसर जुन्या हुतात्मा स्मारकापासून साधारणतः 400 मीटर अंतरावर आहे. हुतात्मा स्मारकातील अमर जवान ज्योतीची स्थापना 1971 च्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ करण्यात आली होती. अमर जवान ज्योतीचे उद्घाटन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते 26 जानेवारी 1972 या दिवशी करण्यात आले होते.

Related Stories

न्यायाधीश रमण होणार नवे सरन्यायाधीश

Patil_p

रेल्वे प्रवासात खासगी क्षेत्राला वाव देणार

Patil_p

किश्तवाडमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार

Patil_p

हिमाचल प्रदेशात भाजपला झटका

Patil_p

वृत्तपत्र व्यावसायिकांचे अर्थमंत्र्यांना साकडे

Patil_p

भारतात आली फ्लाईंग कार

Patil_p
error: Content is protected !!