बेळगाव ; टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व क्रीडाभारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने बेळगाव शहर माध्यमिक आंतर विभाग शिक्षकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सोमवारी प्रारंभ झाला. सदर स्पर्धेत 5 संघानी भाग घेतला आहे. व्हॅक्सिन डेपो मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शहराचे गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, शहराच्या पीईओ जहिदा पटेल, क्रीडाभारतीचे राज्याध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सहसचिव विश्वास पवार, पुरस्कर्ते साईराज बिल्डरचे सांलक महेश फगरे, हनुमान स्पोर्ट्स संचालक आनंद सोमण्णाचे, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, सचिव एच. बी. पाटील माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव उमेश कुलकर्णी, मालतीबाई साळुंखे शाळेचे मुख्याध्यापक के. एम. मन्नोळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी विनायक डिचोलकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते भारत माता प्रतिमो पूजन करण्यात आले. जयसिंग धनाजी, प्रवीण पाटील, बापू देसाई यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर महेश फगरे, आनंद सोमण्णाचे यांनी यष्टीपूजन तर रवी बजंत्री यांच्याहस्ते श्रीफळ वाढून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत टिळकवाडी विभाग, गोमटे स्कूल टिळकवाडी, शहापूर विभाग, कॅम्प विभाग, उत्तर विभाग संघांनी भाग घेतला आहे. सी. आर. पाटील, परशराम मंगनाईक, संजीव नाईक, मोहन पत्तार, बसवराज होसमठ, नागराज भगवंतण्णावर, नितीन नाईक, प्रमोद जपे, प्रभाकर कंग्राळकर, संजीव रेहमानवाले, रामलिंग परीट, संतोष दळवी, उमेश बेळगुंदकर, देवकुमार मंगणाकर, अश्विन पाटील, निखिल कदम, देवेंद्र कुडची, श्रीधर, श्रीहरी लाड, विठ्ठल मुळकूर, महावीर जनगौडा आदी उपस्थित होते. अर्जुन स्पोर्ट्स, युनिव्हर्सल स्पोर्ट्स विजयी


previous post