Tarun Bharat

मुस्लीम विचारवंतांशी सरसंघचालकांचा संवाद

Advertisements

अनेक मुद्दय़ांवर सखोल चर्चा : सांप्रदायिक द्वेष दूर करण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी दिल्लीमधील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत पोहोचून डॉ. इमाम अहमद इलियासी (मुख्य इमाम) समवेत अनेक मुस्लीम धर्मगुरु अन् विचारवंतांची भेट घेतली आहे. या भेटीवेळी भागवत यांच्यासाब्sात संघ प्रचारक इंद्रेश कुमार देखील होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुस्लीम आणि ख्रिश्चनांसोबतचा संवाद वाढविण्यावर भर देण्यात येत आहे, याद्वारे धर्मआधारित गैरसमजुती, सामुदायिक अंतर आणि संवादहीनता दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हिंदुस्थानात राहणारे सर्व लोकांना ‘हिंदू’ मानण्याचा विचार संघाकडून यापूर्वीच मांडण्यात आला आहे.

एका धोरणाला मूर्त रुप देण्यासाठी संघाकडून चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून याची जबाबदारी सह-सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल आणि डॉ. मनमोहन वैद्य यांच्यासह अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल तसेच वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांना देण्यात आली आहे. विरोधी पक्षांचे नेते संघावर आरोप करत असताना हा प्रयत्न होतोय हे विशेष. अलिकडच्या काळात संघाकडून अशाप्रकारच्या बैठका आणि मुस्लीम धर्मगुरु तसेच विचारवंतांशी सरसंघचालक सातत्याने संवाद साधत असल्याचे दिसून येते.

2024 पर्यंत शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संघ कार्याला देशातील एक लाख ठिकाणांपर्यंत पोहोचविण्याच्या लक्ष्यादरम्यान संघाचा हा अभिनव प्रयत्न सुरू आहे. संघ कार्य सध्या देशातील 60 हजारांच्या आसपास स्थानांवरच आहे. अशा स्थितीत संघाने ईशान्येतील काही राज्ये आणि काश्मीरमध्ये लक्ष केंद्रीत केले आहे. या ठिकाणी ख्रिश्चन तसेच मुस्लीम समुदाय बहुसंख्याक आहे.

अखिल भारतीय इमाम संघटनेचे मुख्य इमाम इलिस्यासी यांनी काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांना आमंत्रित केले होते. याचमुळे सरसंघचालकांनी त्यांची भेट घेतली आहे. सरसंघचालक प्रत्येक वर्गातील लोकांना भेटत असतात. सामान्य संवाद प्रक्रियेचा हा भाग असल्याचा दावा संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केला आहे.

देशहिताकरता एकत्र आणणार  संघटनेचे काम वाढू लागल्यावर अन्य संप्रदायाचे लोक देखील जोडले जात आहेत, संघाबद्दल पसरविण्यात येणारा गैरसमज दूर करण्यासाठी त्याला जवळून जाण्याचा घेण्याचा प्रयत्न केले जात आहेत. या संप्रदायांमध्ये राष्ट्रवादी विचारसरणीचे लोक आहेत, हे लोक स्वतःची पूजा पद्धती आणि श्रद्धेवर कायम राहत देशहिताकरता एकत्र येऊन काम करू इच्छितात असे संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने म्हटले आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंच ही वेगळी व्यवस्था आहे, कारण ती मुस्लिमांकडून मुस्लीम समुदायासाठी संघटना चालविली जात असल्याचे पदाधिकाऱयाने नमूद पेले आहे.

Related Stories

ममता बॅनर्जी मंत्रिमंडळात बुधवारी फेरबदल

Patil_p

60 मुलींचे एमएमएस व्हायरल

Patil_p

विदेशी जाणाऱ्यांसाठी कोविन ऍपवर नवे फिचर

Patil_p

नुकसानग्रस्तांसाठी मदतीचे स्वरूप निश्चित

Patil_p

दोन्ही मतदारसंघांमध्ये चन्नी हरणार

Patil_p

प्रियांका गांधींनी म्युकरमायकोसिस इजेक्शन कमतरेतवरून साधला मोदी सरकारवर निशाणा, म्हणाल्या…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!