प्रतिनिधी /पणजी
थोर मराठी साहित्यकि जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी निमित्त गोवा मराठी अकादमीतर्फे शुक्रवारी इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात रंगभूमी ग्रुप,बेळगाव प्रस्तुत जी. ए. यांच्या कथांचे संवादात्मक अभिवाचन हा कार्यक्रम रसिकांना सुखावून गेला.यात ऑर्फीयस,राधी, चैत्र, लक्ष्मी,माणसं,अरभाट आणि चिल्लर या जी. ए. यांच्या कथांचे संवादात्मक अभिवाचन ऐकतांना त्या कथामधील नाटय़, सहज सुंदर संवाद भाषेची नजाकत यांचा आस्वाद घेण्याची संधी लाभली. राधी या कथेचे सादरीकरण तर विलक्षण प्रभावी होते. त्यातील विविध प्रसंग,पात्रे, त्यांचे संवाद,भाषेचा लहेजा लाजवाब होते.संवादात्मक रूपांतर आणि दिग्दर्शन मेधा मराठे यांचे होते व स्वतः त्या आणि त्यांच्या सोबत प्रिया काळे,अर्चना ताम्हनकर, विद्या देशपांडे, नुपूर रानडे,सुधीरशेंडे व चिन्मय शेंडे यांनी सुरेख सादरीकरण केले. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .