नारायण जाधव स्मृती जलतरण स्पर्धा
बेळगाव : आबा स्पोर्ट्स क्लब, हिंद सोशल क्लब आयोजित नारायण जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रति÷ान यांच्यातर्फे आंतरक्लब जलतरण स्पर्धेला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला.
गोवावेस रोटरी मनपा जलतरण तलावात आंतरक्लब जलतरण स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब काकतकर, शिवाजी हंगिरगेकर, नितिन जाधव, गोपाळराव बिर्जे, आप्पासाहेब गुरव, शिवाजी बाडिवाले, विजय भातकांडे, परशराम येळ्ळूरकर, उद्य चौगुले, अनंत लाड, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, नेताजी जाधव, श्रीधर (बापू) जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आप्पासाहेब गुरव म्हणाले नारायणराव जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रति÷ानचे विद्यार्थ्यांसाठी पोहण्याच्या स्पर्धा भरवून होतकरू जलतरणपटूंना वाव देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. जलतरण स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना चपळ व चलाखीचे बळ येते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना आपल्या पुढील जीवनात नक्कीच मिळतो. या प्रति÷ानने खेळाडूंसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. इतर संघटनांनीही खेळाडूंना वाव देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. प्रारंभी माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले. नेताजी जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत 80 हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. यावेळी शिवराज मोहिते, संदीप मोहिते, किशोर पाटील, भरत पाटील, शशिकला मंगोलकर, ज्योती पवार, रणजित पाटील, मारूती घाडी, प्रकाश बेळगोजी व हिंद आबा क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.