सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी मारली हाक : केपे अर्बंनचा स्थापना दिवस उत्साहात
प्रतिनिधी /मडगांव
गोव्यातील सहकारी संस्थांच्या कर्जावरील व्याज 10 टक्क्मयांपेक्षा कमी असावे ही आपली अपेक्षा आहे आणि सहकारी संस्थां त्या दृष्टीकोनातून नक्कीच विचार करतील असे उद्गार सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल रविवारी मडगावात बोलताना काढले. केपे अर्बंनच्या स्थापना दिनात ते बोलत होते.
गोव्यातील सहकारी संस्थां या सावकारी संस्थां नाहीत हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. 10 टक्के, 12 टक्के, 14 टक्के असे व्याज आकारून आम्ही कुणाचे शोषण करतो तर ते गोवेकरांचे. कर्ज घेणाऱया गोवेकरांचे शोषण बंद व्हायला पाहिजे. आम्हाला सहकार क्षेत्रात नफा हवा आहे. तीन कोटींवरून तो चार कोटी असा चढय़ा क्रमाने असला पाहिजे. त्यासाठी वेगळे मार्ग आत्मसात करण्याचा सल्ला सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिला.
20-30 वर्षापूर्वी आम्ही सावकाराकडून कर्ज घेत होतो. त्यालाही व्याज आकारले जायचे. आज सहकारी संस्थांतून कर्ज घेतो. मात्र, सहकारी संस्थांचे व्याज दर पाहिल्यास सावकारी कर्ज परवडले नव्हे सहकारी संस्थांचे. सहकार क्षेत्रात काम करणाऱयांनी व्याज दराकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा नवीन सावकार तयार होतील असे ते म्हणाले.
राजकारणी चालविणाऱया बँका रसातळाला गेल्या
गोव्यात राजकारणी चालविणाऱया बँका रसातळाल्या गेल्याची उदाहरणे आमच्या समोर आहे. केपे अर्बन मल्टिपर्पज क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप व उपाध्यक्ष आपण स्वता सुभाष फळदेसाई हे गेली कित्येक वर्षे राजकारणात आहेत. आम्हा दोघांचे राजकीय पक्ष वेगवेगळे झाले, व्यासपीठावरील भाषणे वेगवेगळी झाले. परंतु, संस्थेचे हित जपण्याचा सातत्याने प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा संस्थेसाठी एका टेबलावर बसलो तेव्हा कधीच राजकारणाला वाव दिला नाही. एकमेकांचे पाय ओढण्याचा देखील कधीच प्रयत्न केला नाही असे उद्गार यावेळी समाज कल्याणमंत्री सुभाष फळेदसाई यांनी काढले.
केपे अर्बंनच्या स्थापना दिनाच्या व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, सहकार निबंधक विशांत गावणेकर, सरव्यवस्थापक संतोष गावकर, संस्थेचे संचालक चंद्रकांत गांवकर, नागेश वेळीप, परेश कुंकळय़ेकर, सतीश वेळीप, हर्ष रेगे, ज्योती वेळीप, शुभा फळदेसाई, भिक्रू वेळीप व विनोद जांबावलीकर उपस्थित होते.
सुरवातीला अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक करताना केपे अर्बंनच्या गेल्या तीस वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी केपे अर्बंनच्या 22 शाखांतून चांगला व्यवहार करणाऱया 22 सभासदांचा गौरव करण्यात आला. तसेच दोन पिंग्मी एजंटाचाही गौरव करण्यात आला. सुरवातीपासून केपे अर्बंनशी सलग्न असलेल्या दहा कर्मचाऱयांचा देखील या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. त्याच बरोबर शैक्षणिक पातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.