Tarun Bharat

ऑर्चर्ड रिसॉर्टमध्ये आंतरराष्ट्रीय शेफ दिन साजरा

विविध उपक्रमातील विजेत्यांना बक्षीस वितरण

प्रतिनिधी / बेळगाव

विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे सादरीकरण करण्याची स्पर्धा, सोबतीला गाण्यांचा आनंद, आश्रय फौंडेशनच्या मुलांसाठी मनोरंजनपर कार्यक्रम आणि ग्रीन एकर बँक्वेटचे उद्घाटन अशा विविध उपक्रमांनी नावगे येथील द ऑर्चर्ड रिसॉर्ट येथे आंतरराष्ट्रीय शेफ दिन साजरा करण्यात आला.

वर्ल्ड असोसिएशन ऑफ शेफ सोसायटीने 20 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय शेफ दिन म्हणून घोषित केला आहे. त्या निमित्ताने ऑर्चर्ड रिसॉर्ट येथे संपूर्ण दिवसभर विविध उपक्रम पार पडले. सकाळी शेफसाठीच खाद्यपदार्थांची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये हॉटेल समुद्र, बगीचा, ऑर्चर्ड, पॉपईन, गुंजन धाबा, बगीचा आऊटडोअर केटरिंग, गराज कॅफे व फुडस्ट्रीट येथील शेफनी भाग घेतला.

सकाळी पहिल्या सत्रात सर्व शेफनी मेन्युकार्डमधील कोणताही पदार्थ तयार करावयाचा होता. सर्वच शेफनी आपले कौशल्य पणाला लावून शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ तयार केले होते. स्पर्धेचे परीक्षण शेफ बेंकु गावडे, नेटिव्ह बाय चान्सरीचे शेफ उमेश गावडा, नेक्ससच्या प्रवर्तक प्रिती पाटील व नेटिव्हच्या एचआर एच. डी. नयना यांनी केले.

दुपारी लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या हस्ते ग्रीन एकर बँक्वेटचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी लोकमान्यचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, सीएफओ वीरसिंग भोसले, सीईओ अभिजित दीक्षित, कर्नल दीपक गुरुंग, किरण गावडे आदी उपस्थित होते. सदर बँक्वेट लग्न समारंभ, स्वागत समारंभ व तत्सम सर्व सोहळय़ांसाठी खुला करण्यात आला आहे.

दुपारच्या सत्रात स्पर्धेतील विजेत्यांना किरण ठाकुर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सहभागाबद्दल सर्वांनाच भेटवस्तु देण्यात आली. त्याचप्रमाणे सीएसआर अंतर्गत आश्रय फौंडेशनला भेटवस्तु व मुलांसाठी खाऊ देण्यात आला. या कार्यक्रमासाठी जनरल मॅनेजर नरोत्तम रॉय, एचआर अनिकेत उदय म्हाडगुत, एक्झिक्मयुटिव्ह शेफ कल्लाप्पा भातकांडे तसेच रिसॉर्टचे व्यवस्थापक रतन वेर्णेकर यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचा आनंद गोपी धोंगडी यांच्या गीतगायनाने अधिक दुणावला.

Related Stories

शेतकऱयांसाठी ट्रक्टर योजना कार्यान्वित

Patil_p

गणरायापासून कलेची सुरुवात…!

Amit Kulkarni

आदर्शनगर रहिवाशांतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव

Amit Kulkarni

विविध मागण्यांसाठी बेळगुंदी येथील तरुणांचे आरोग्य केंद्राला निवेदन

Patil_p

हाणामारीनंतर रेल्वेस्थानकाबाहेर तणाव

Amit Kulkarni

बेळगावात ग्राहक आयुक्त न्यायालयास मंजुरी

Amit Kulkarni