प्रतिनिधी / बेळगाव
‘द ऑर्चर्ड रिसॉर्ट’ नावगे येथे दि. 20 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय शेफ दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून आंतरराष्ट्रीय शेफ दिवस कार्यक्रम द ऑर्चर्ड रिसॉर्ट नावगेच्या प्रांगणात चालू होईल. बेळगाव व गोवा येथील नामांकित शेफ या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. या दिनाच्या निमित्ताने ‘द ऑर्चर्ड रिसॉर्ट’ नावगे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रीन एकर बँक्वेटचे उद्घाटन होणार आहे. ग्रीन एकर बँक्वेट येथे विविध समारंभाचे आयोजन करण्याची सोय असून एकाच वेळी 600 लोकांची सोय असे भव्य प्रांगण आहे. लहान घरगुती समारंभ आयोजित