Tarun Bharat

International Coffee Day 2022 : शरीराला आणि मनाला तरतरी आणणाऱ्या कॉफीचे फाय़दे- तोटे, जाणून घ्या एका क्लिकवर

International Coffee Day 2022 : आज १ ऑक्टोबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा केला जातो. हातात गरमा गरमा कॉफीचा कफ आणि समोर पडणारा पाऊस असं समीकरण सगळ्यांनाच आवडतं. जगभरात काॅफी प्रेमींची काही कमी नाही. अनेकांचा दिवसच या काॅफीने सुरु होतो. रात्रीचा अभ्यास करणारे विद्यार्थी, रात्रीची शिफ्ट असणारे कर्मचारी यांच्यासाठी काॅफीची खूपचं मदत होते. कॉफी तरतरी आणणारी, खास चव आणि स्वाद असलेली एक उत्तेजक पेय आहे.

कॉफीमध्ये ग्रीन कॉफी, ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी, कोल्ड कॉफी, फिल्टर कॉफी, एस्प्रेसो कॉफी, कॅपुचिनो कॉफी, लाटे कॉफी, माकीयाटो कॉफी असे प्रकार अनेकजण आवडीने पितात. आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा करण्यासाठी आज कुटुंबे, मित्रपरिवार एकत्र येतात आणि काॅफीचा घोट घेत आपल्या आठणींना उजाळा देतात. अशी उत्साह देणारी काॅफी शरीरासाठी किती फायदेशीर आहे आणि किती नुकसानकारक आहे याविषयी आपण जाणून घेऊया.

कॉफी पिण्याचे फायदे

अल्झायमर
एक कप कॉफी तुम्हाला अल्झायमरसारख्या आजारांपासून वाचवू शकते. कॉफी अल्झायमर, न्यूरोडीजनरेटिव्ह आणि डिमेंशिया सारख्या धोकादायक आजारांपासून संरक्षण करते. जे लोक कमी कॉफी पितात त्यांच्यामध्ये याचा धोका कमी असतो.

रक्तदाब आणि साखर
रक्तदाब कमी करण्यासाठी कॉफी उपयुक्त आहे. यासोबतच साखरेवर नियंत्रण ठेवते. कॉफीमुळे रक्तदाब आणि साखरेचा धोका कमी होतो.

आळस दूर करते
कॉफी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यामुळे तुमचा आळस दूर होईल आणि तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात नव्याने उमदीने करू शकता.

तणाव कमी होतो
एक कप कॉफी तुमचे सर्व टेन्शन दूर करते. तणाव कमी करण्यासाठी कॉफी खूप फायदेशीर आहे. कॉफी तुम्हाला डिप्रेशनमध्ये जाण्यापासूनही दूर ठेवते.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त
वजन कमी करण्यासाठी कॉफी पिणे खूप फायदेशीर आहे. कॉफीमध्ये असलेले कॅफिन फॅट बर्न करण्यास मदत करते.

कॉफी पिण्याचे तोटे
निसर्गाच्या नियमानुसार कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे शरीरासाठी घातक आहे. काॅफी जशी शरीरासाठी आरोग्यदायी असली तरीही तिचे तोटे अनेक आहेत. कॅफिनमुळे कॉफीचे व्यसन तुम्हाला लागू शकते. एखादेवेळी जर तुम्हाला काॅफी प्यायला नाही मिळाली तर तुम्हाला डोकेदुखी, थकवा आणि चिडचिड होऊ शकते. जास्त कॉफी पिणे हानिकारक आहे. अनेक लोकांमध्ये पॅनीक अटॅक देखील दिसून आले आहेत. जास्त कॉफी प्यायल्याने अस्वस्थता वाढते.निद्रानाश होऊ शकतो. याशिवाय, चिंता आणि पोटाचा त्रास होऊ शकतो.

Related Stories

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ६ वाहनांचा विचित्र अपघात

datta jadhav

कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांना जामीन मंजूर

Tousif Mujawar

ममता बॅनर्जी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

datta jadhav

पुणे, कोल्हापूरकरांसाठी म्हाडाची खूशखबर, पहा काय आहे आनंदवार्ता…

datta jadhav

दिल्ली सरकारनं घेतला मोठा निर्णय! सर्व खासगी कार्यालयांना…

Archana Banage

जिह्यातील एक लाख 17 हजार हेक्टर क्षेत्राला पाणी : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Abhijeet Khandekar