इराणचा हमीद व भारताचा प्रविण कोहाली यांच्यातील लढत लक्षवेधी : किताबाच्या 15 कुस्त्या, पुरस्कृत 30 सह 250 वर कुस्त्या मैदानात होणार : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कुस्ती शौकीनांच्या उपस्थितीची परंपरा
वारणानगर / दिलीप पाटील
येथील वारणा उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरणार्थ 13 डिसेंबरला विश्वनाथ वारणा शक्ती आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्रामाचे आयोजन केले आहे, अशी माहिती वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. यावेळी वस्ताद संदिप पाटील, दिलीप महापुरे उपस्थित होते. वारणा विद्यालयाच्या प्रांगणात या भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय कुस्तीचा महासंग्राम होणार आहे.
अशा होणार लढती
भारत हिंदकेसरी प्रीतपाल फगवाडा (पंजाब) विरुद्ध हिंदकेसरी उमेश मथुरा (हरियाणा)
इराणचा जागतिक विजेता हमीद विरुद्ध भारत हिंदकेसरी प्रवीण कोहाली (पंजाब)
कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उत्तरप्रदेश केसरी विजय बाबर
गंगावेशचा माऊली जमदाडे विरुद्ध सोनीपत आखाडय़ाचा विजय
महाराष्ट्र केसरी शैलेश शेळके विरुद्ध पंजाबचा राष्ट्रीय विजेता नवप्रीत खन्ना
गंगावेशचा प्रकाश बनकर विरुद्ध पंजाब केसरी रोहित
राष्ट्रीय विजेता माऊली कोकाटे विरुद्ध पंजाबचा राष्ट्रीय विजेता भाऊ फगवाडा
पुण्याचा राष्ट्रीय विजेता अक्षय शिंदे विरुद्ध बारामतीचा राष्ट्रीय विजेता भारत मदने,
दिल्लीचा वीर गुलीया विरुद्ध कार्तिक काटे (कर्नाटक)
कर्नाटकचा सुनील फडतरे विरुद्ध सेनादलाचा आंतरराष्ट्रीय विजेता संग्राम पाटील
कोल्हापूरचा शुभम सिद्धनाळे विरुद्ध पुण्याचा सुदर्शन खोतकर
कोल्हापूरचा सोनबा गोंगाणे विरुद्ध राष्ट्रीय विजेता महेश अंथणी
वारणेचा नामदेव केसरे विरुद्ध हरियाणाचा संजय कुमार
वारणेचा उदय खांडेकर विरुद्ध पंजाबचा भाविकांना यांच्यात अनुक्रमे लढती होणार आहेत.