नोट 12 दाखल ः दमदार कॅमेरा बॅटरीची जोड
नवी दिल्लीः
इनफिनिक्स कंपनीने आपला सर्वात स्वस्त गेमिंग फोन इनफिनिक्स नोट 12 भारतात लाँच केला आहे. या फोनला मीडियाटेक हिलियो जी 85 अल्ट्रा गेमिंग प्रोसेसर असणार असून 10 लेयर कुलिंग सिस्टीमची प्रणाली यात असेल. 4 जीबी रॅम व 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह सदरचा फोन येणार असून 13 हजार रुपयांपर्यंत याची किंमत असेल. सुरुवातीला खरेदी करणाऱया ग्राहकांना 1 हजार रुपयांपर्यंतची रोख रक्कम परत मिळू शकणार आहे.
6.8 इंचाचा टीएफटी-एलसीडी डिस्प्ले असणार असून स्मार्ट फोनमध्ये सेल्फीसह सेन्सर्ससाठी डिस्प्लेसोबत वॉटर ड्रॉपनॉच असणार आहे. सुरक्षिततेकरिता कॉर्निंग गोरिला ग्लास 3 चे संरक्षण मिळणार आहे. 50 मेगा पिक्सलचा प्रायमरी, 2 मेगा पिक्सलचा डेप्थ आणि प्रंटमध्ये 8 मेगा पिक्सलचा कॅमेरा असेल. 5 हजार एमएएच बॅटरीसोबत 33 व्हॅटचा फास्ट चार्जर दिला जाणार आहे.
महत्त्वाचे….
?किंमत 13 हजार रुपये
?50 मेगापिक्सलचा कॅमेरा
?6.8 इंचाचा एलसीडी डिस्प्ले
?कॉर्निंग गोरिला ग्लास
?5000 एमएएच बॅटरी, 33 व्हॅटचा चार्जर