चेन्नई : हिंदुजा समूहाची इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) शाखा स्विच मोबिलिटी यांनी आपली इलेक्ट्रिक बस ईआयव्ही 12 चे सादरीकरण केले आहे. या सादरीकरणासोबत कंपनीने ईव्ही उद्योगात मोठी हिस्सेदारी प्राप्त करण्याची योजना आखली आहे. यासोबतच कंपनीचा उद्देश हा शहरांच्या अंतर्गत विविध शहरे, शाळांसह अन्य वर्गवारीत आपली सेवा देण्यावर भर देणार असल्याची माहिती आहे.
स्विच मोबिलिटी यांनी म्हटले आहे, की प्रवासी बस या विविध मॉडेलमध्ये उपलब्ध करुन देणार असून यामध्ये एका चार्जिंगवर बस 100 ते 300 किलोमीटर इतके अंतर कापणार आहे. यासोबतच सदरच्या मॉडेलची किमत ही साधारणपणे एक कोटी रुपयांच्या आसपास राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
विविध राज्यांसोबत चर्चा सुरु
स्विच मोबिलिटी या बस रस्त्यांवर उतरण्यासाठी विविध राज्य सरकारसोबत चर्चा सुरु असल्याचे कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू यांनी सांगितले आहे.