नवीन अत्याधुनिक सुविधांसोबत बाजारात मॉडेल
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एमजी मोटारने भारतामध्ये आपली अपडेटेड फुल साईज एसयूव्ही ग्लॉस्टर गाडी बाजारात सादर करण्यात आली आहे. कंपनीने याला ‘ऍडव्हान्स ग्लॉस्टर’ असे नाव दिले आहे. या नवीन मॉडेलच्या डिझाइनला पहिल्याप्रमाणे ठेवण्यात आले आहे. याची इंटीरियरमध्ये 75 पेक्षा जादाची नवीन कनेक्टेड कार फिचर्स देण्यात आली आहेत.
टॉपच्या मॉडेलची किमत
भारतामध्ये एमजी ग्लॉस्टर 2022 ची सुरुवातीची एक्स शोरुम किमत 31.99 लाख कोटी रुपये राहणार असल्यची माहिती असून याममध्ये तीन नवीन मॉडेलचा समावेश होणार आहे. यासह 7 सिटर सॅव्हीच्या टॉपच्या मॉडेलची किमत ही 40.77 लाख रुपये असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
अन्य फिचर्स
- मस्कूलर बोनट, मोठा क्रोम फिनिश्ड ग्रिल व स्लीक एलइडी हेडलाईट्स व सिल्वर स्किड प्लेड
- रुफ रेल्स, इंडिकेटर माउंटेड आउट साइड रियर व्यू मिरर्स
- 19 इंच अलॉय व्हील ही मिळणार आहे.