वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मायक्रोसॉफ्टने त्यांच्या वार्षिक कार्यक्रम ‘सरफेस’ मध्ये प्रो 9 टॅबलेट, लॅपटॉप 5 आणि स्टुडिओ 2 प्लस संगणक लाँच केला आहे. या कार्यक्रमात कंपनीने गेमिंग ऍक्सेसरीजचे अनावरणही केले. जे 25 ऑक्टोबरला लॉन्च होणार आहे. ‘डिझायनर’ नावाचे ऍपही सादर करण्यात आले. एआय आधारीत हे ऍप ग्राफिक डिझायनर्ससाठी बनवले असल्याची माहिती आहे.
ग्राहक मायक्रोसॉफ्ट के टच टॅबलेट सरफेस प्रो 9 लॅपटॉपवरुन टॅबलेटमध्ये आणि टॅबलेटवरुन लॅपटॉपमध्ये सहजपणे रुपांतरीत करु शकतील. यासोबतच सरफेस प्रो 9 2 प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. यातील एकामध्ये 12 जनरेशन इंटेल कोर प्रोसेसर आहे. तर दुसऱयामध्ये मायक्रोसॉप्ट एसक्यू प्रोसेसर आहे. क्वालकॉमच्या भागीदारीत बनवलेले उपकरण देखील 5जी कनेक्टिव्हिटी जोडण्यास सक्षम असतील.
वाय-फाय मॉडेलमध्ये 3 रॅम पर्याय
टॅबलेटच्या वाय-फाय मॉडेलमध्ये 8 जीबी, 16 जीबी आणि 32 जीबी रॅमचे तीन पर्याय आहेत. त्याचवेळी, 5जी कनेक्टिव्हिटी डिव्हाइसमध्ये 8जीबी आणि 32 जीबीचे 2 पर्याय आहेत. इंटेल आवृत्तीला 512जीबी अंतर्गत स्टोरेज मिळेल आणि एसक्यू 3 आवृत्तीमध्ये 1टीबी स्टोरेज मिळेल. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत अंदाजे 82,999रुपये आहे.
19 तासांचा बॅटरी बॅकअप
इंटेल आवृत्तीला 15.5 तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल आणि क्वालकॉम आवृत्तीला 19 तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल. यात 13-इंच क्रीन आणि 120 एचझेडचा रिप्रेश रेट असेल.