वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बजाज ऑटोने अपडेटेड प्लॅटिना 110 एबीएस हे मॉडेल बाजारपेठेत सादर केले आहे. बजाज प्लॅटिना 110 एबीएस 72,224 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) या सुरुवातीच्या किमतीत सादर करण्यात आली आहे. प्लॅटिना-110 ही 100-110 सीसी विभागातील पहिली आणि एकमेव अशी एबीएस लीफ मोटरसायकल असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
नवीन बजाज प्लॅटिना 110 एबीएसमध्ये 115.45 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे जे 7,000 आरपीएमवर 8.4बीएचपी पॉवर आणि 5,000 आरपीएमवर 9.81 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाइकचा टॉप स्पीड 90 केएमपीएच राहणार असल्याचा दावा आहे.
बजाज ऑटोचे अध्यक्ष सारंग कानडे म्हणाले, ‘जगात भारतात सर्वाधिक रस्ते अपघात मृत्यू आहेत, त्यापैकी 45 टक्के अपघात दुचाकी वाहनांमुळे होतात. बाइक रायडर्सना अनेकदा पॅनिक ब्रेकिंग परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी उत्तम ब्रेकिंग सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे रानडे यांनी म्हटले आहे.