Tarun Bharat

हिरो पॅशन एक्सटेक दुचाकी सादर

Advertisements

किंमत 74 हजारापुढे : अनेक वैशिष्टय़ांचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हिरो मोटो कॉर्प कंपनीची नवी पॅशन एक्सटेक ही बाईक विविध वैशिष्टय़ांनी युक्त अशी नुकतीच सादर करण्यात आली आहे. सदरच्या गाडीची किंमत 74 हजारापुढे असणार आहे. या बाईकवर कंपनीने 5 वर्षांची वॉरंटी दिली असून या वाहनामध्ये ब्ल्युटूथ कनेक्टिव्हीटीची सोय असणार आहे.  कंपनीने पहिल्यांदाच आपल्या या नव्या मॉडेलमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेला आहे. आधीच्या हॅलोजन दिव्याच्या तुलनेमध्ये नवा दिवा 12 टक्के अधिक चांगला प्रकाश देऊ शकणार आहे. पावसाळय़ाच्या दिवसामध्ये नव्या हेडलॅम्पमुळे चालकांना चांगले दिसू शकणार आहे.

ही असणार वैशिष्टय़े

ब्ल्युटूथ कनेक्टिव्हीटीमुळे फोन कनेक्ट करता येणे शक्य होणार आहे. स्मार्टफोन चार्ज करण्याच्या सुविधेसह रियल टाईम मायलेज इंडिकेटर आणि लो फ्युल ऍलर्ट या सुविधाही यात असतील. 12 लिटर इंधन क्षमतेची टाकी या गाडीला असणार असून प्रति लिटर मागे 68 किलो मीटर इतके मायलेज ही गाडी देणार आहे.

Related Stories

‘निस्सान’ मॅग्नाइटची 50,000 वी गाडी चेन्नई प्रकल्पात तयार

Patil_p

प्रवासी वाहनांनी मागणीत नोंदवली वाढ

Amit Kulkarni

टीव्हीएसची नवी अपाचे दाखल

Omkar B

40,000 इको गाडय़ा परत मागवल्या

Patil_p

‘शेतकर्‍यांच्या‘‘ इंधनावर पळणार देशी गाडया..!

Nilkanth Sonar

होंडाच्या नव्या अमेझचे बुकिंग सुरु

Patil_p
error: Content is protected !!