हेड अप डिस्प्ले फिचर : 6 एअरबॅग मिळणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मारुती सुझुकीकडून गुरुवारी न्यू ब्रिझा 2022 ही सादर करण्यात आली आहे. याची सरुवातीची किमत 7.99 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी निश्चित केली आहे. यातील ऑटोमेटिव्ह टॉप मॉडेलची किमत ही 13.96 लाख रुपये आहे. 11,000 रुपयामध्ये ऑनलाईन व डिलरशिप दोन्हींवर ऑनलाइन गाडी बुक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
सदरच्या गाडीत इलेक्ट्रिक सनरुफ यासारख्या अत्याधुनिक फिचर्सची सुविधा प्राप्त होणार आहे. नवीन बदलत्या टेक्नॉलॉजीसह अन्य कनेक्टेड फिचर्सची सेवा मिळणार आहे. तर काही हायटेक फिचर्सही देण्याची तयारी आहे. यामध्ये अँड्रॉईड ऑटो, ऍपल कारप्लेसोबत 9.0 इंच मोठा स्मार्टप्ले प्रो व टचस्क्रीन इन्फोमेन्ट सिस्टम व ऍप सपोर्टच्या आधारे 40 पेक्षा अधिक कनेक्टेड फिचर्स मिळणार आहेत.
इंजिन व गिअरबॉक्स
नवीन मारुती सुझुकी ब्रिझाने अपडेटेड 1.5 लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे. तर एक्सएल6 आणि आर्टिगामध्येही येणार आहे. याची मोटार 101 बीएचपी पॉवर व 136.8 एनएम पीक टॉर्क जनरेट करत आहे.