Tarun Bharat

चॅट जीपीटीच्या नवीन व्हर्जनचे सादरीकरण

जीपीटीमधील सात पद्धतीमुळे बदलत आहे जीवन : नवे व्हर्जन जीपीटी-4 ची कमाल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आज काय खायला करावे हे समजेनासे झाले की घरातला फ्रीज उघडला जातो. तेव्हा फ्रिजमध्ये ठेवलेल्या एका सामानाच्या फोटोवर क्लिक करुन चॅटबोटला तो पाठवला जातो आणि मग फोटो पाहून चॅटबॉट डिश बनविण्यासाठीच्या रेसिपी देतो. हो हे खरे आहे. आता तसे शक्य आहे. यासोबतच आजारी पडल्यानंतर आपल्याला उपचाराचा सल्लादेखील देतो व विनोदही ऐकवतो. हे सर्व शक्य होईल ते नव्या चॅटजीपीटीच्या 4 व्हर्जनमुळे. बघुया काय आहे त्यात खास ते.

14 मार्च रोजी ओपन एआय कंपनीने आपल्या चॅटजीपीटीचे नवीन अपडेट व्हर्जन जीपीटी-4ची सुरुवात केली आहे. यावर अगोदरपासूनच क्रिएटीव्ह विश्वासपूर्ण यासह अन्य घटकांची माहिती करुन घेणार आहोत.

जीपीटीच्या या पद्धतीचा प्रभाव :

1.प्रत्येक प्रश्नाचे  मिळणार उत्तर

आता जीपीटी-4 आपल्या प्रत्येक प्रश्नाचे पहिल्यापासूनच उत्तर देणार आहे. अमेरिका आर्टिफिशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञानावर रिसर्च करुन ओरेन एटजियोनी नावाच्या व्यक्तीने चॅटजीपीटीने शेवटचे व्हर्जन जीपीटी-4 तयार केले आहे.

2.साहित्याच्या फोटोवऊन रेसिपी:

चॅटजीपीटी या जीपीटी -3.5 टेक्स्ट ही भाषा समजावून सांगू शकतो. परंतु आता जीपीटी-4 टेक्स्टसोबत इमेजदेखील समजू शकणार आहे. ती बनविणारी कंपनी ओपन एआयचे सहसंस्थापक ग्रेन ब्रोकमॅन यांनी सांगितले की मी आपल्या फ्रिजमध्ये ठेवलेल्या सहित्याच्या फोटोच्या आधारे प्रश्न विचाल्यावर रेसिपी पाठवली जाते.

3.रुग्ण व आजारपणाबद्दल सांगा :

युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ केलिनाचे प्राध्यापक अनिल गेही नेसर यांना एक आजारी गृहस्थ भेटले. त्यांनी जीपीटी-4 ला आपल्या आजाराची समस्या सांगितली. त्यानंतर उपचार व औषधांचा सल्लाही यावेळी देण्यात आला. यामुळे आता जीपीटी-4 हे मेडिकल क्षेत्रासाठी योगदान देणार असल्याचे म्हटले जात आहे.

4.कोणत्याही लेखाचे रिसर्च पेपरचे वर्णन

रिसर्च पेपर किंवा कोणत्याही लेखाचे वर्णन किंवा संबंधीत सविस्तर माहिती जीपीटी-4 कडून आता मिळू शकणार आहे. 

5.हजरजबाबीपणासह विनोदही ऐकवणार

आता कोणी जवळ नसेल तर एकटेपणा जाणवणार नाही. कारण आता जीपीटी-4 सेंस ऑफ ह्यूमर मार्फत विनोदही येणाऱ्या काळात ऐकवणार आहे. वैज्ञानिकाच्या मतानुसार जीपीटी 3.5 च्या तुलनेत जीपीटी 4 मधील सेंस ऑफ ह्युमर अधिक वैशिष्ट्यापूर्ण राहणार आहे.

6.परीक्षेत 81 टक्के प्रश्नांची उत्तरे देणार

जीपीटी-4 बनविणाऱ्या कंपनीने आता दावा केला आहे, की परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या जवळपास 81 टक्के प्रश्नांची उत्तरे बरोबरच देणार आहे. यामध्ये संशोधनामधून असे समोर आले आहे, की अमेरिकेत 41 राज्यांमध्ये जीपीटी-4 ने योग्य उत्तरे दिली असल्याची माहिती आहे.

7.जीपीटी-4 च्या आधारे न्यायालयीन लढा लढता येणार

 प्रश्नांचे खरे उत्तर देण्यासोबत चॅटजीपीटी-4 आता न्यायालयीन फाईल्सची प्रकरणे हाताळणार असून यामध्ये एखादी न्यायालयीन लढाई चॅटजीपीटी लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Stories

आला 7000 एमएएच बॅटरीचा मोबाईल

Patil_p

नफा वसुलीमुळे सेन्सेक्स-निफ्टीत घसरण

Amit Kulkarni

अदानी ग्रीन एनर्जी नफ्यात

Patil_p

‘कू’ प्लॅटफॉर्म करणार 500 जणांची भरती

Patil_p

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्सची 800 अंकांवर झेप

Patil_p

प्राप्तिकरकडून 1.18लाखकोटींचा परतावा सादर

Patil_p