Tarun Bharat

पल्सर एन 160 दुचाकी सादर

किमत 1.23 लाख रुपये राहण्याचे संकेत : अत्याधुनिक फिचर्स

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

बजाज ऑटो या कंपनीने अखेर आपली नवीन बजाज पल्सर एन 160 भारतीय बाजारात दाखल केली आहे. या गाडीची सुरुवातीची किमत ही जवळपास 1.23 लाख रुपये (एक्स शोरुम) किमत राहणार असल्याचे संकेत आहेत. सदरची गाडी दोन ते तीन रंगात मिळण्याची शक्यता आहे.

सिंगल चॅनेल एबीएस व्हर्जनमध्ये कॅरिबियन ब्लू, रेसिंग रेड आणि टेक्नो ग्रे इत्यादी पर्यायामध्ये ही गाडी उपलब्ध होणार आहे.

कंपनीने नवीन बजाज पल्सर एन 160 दोन मॉडेलमध्ये सादर केली आहे. यात सिंगल चॅनेल व डबल चॅनेल एबीएसचा समावेश राहणार आहे. या गाडीची टक्कर ही बाजारातील दुचाकी यामाहा एफझेड, टीव्हीएस, अप्पाचे आरटीआर 160 4 व्ही आणि सुझुकी जिक्सर या मॉडेलसोबत राहणार असल्याचेही दिसून येत आहे.

स्टायलिंगसह फिचर्स

डिझाईनचा विचार केल्यास बजाज पल्सर एन 160 मोठी पल्सर एन250 चा  प्रकार असणार आहे. या नवीन मॉडेलमध्ये समान सिंगल एलइडी प्रोजेक्टर हेडलॅम्प असू शकतो. फ्यूल टँक, स्प्लिट सीट, अलॉय व्हील यासारख्या सोयी असणार आहेत.

प्रमुख सुविधा

  • युएसबी चार्जिंग पोर्ट
  • 14 लिटरचा फ्यूल टँक
  • डिजी ऍनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर
  • यासोबतच 5 स्पीड गियरबॉक्स
  • एन 160 ला 37 एमएम टेलिस्कोपिक फोर्क अप प्रंट

Related Stories

जुन्या कार्सची विक्री तीन पटीने वाढली

Amit Kulkarni

सप्टेंबरमध्ये किरकोळ वाहन विक्रीत घसरण

Amit Kulkarni

मर्सीडिझ बेंझने विकल्या 550 मोटारी

Patil_p

वाहन स्क्रॅप पॉलिसी ; नव्या गाडीसाठी सवलत

Amit Kulkarni

होंडाची नवी अमेझ कार बाजारात

Patil_p

बीएमडब्ल्यूची ‘220 आय ब्लॅक आय शॅडोव’ कार लाँच

Amit Kulkarni
error: Content is protected !!