सुहाना खान, खुशी कपूर अन् अगस्त्य नंदा झळकणार
जोया अख्तरने स्वतःचा आगामी चित्रपट ‘द आर्जीच’चा टीझर आणि फर्स्ट पोस्टर सादर केला आहे. झोयाच्या या चित्रपटात स्टार किड्स म्हणजेच शाहरुख खानची कन्या सुहाना, श्रीदेवीची कन्या खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा दिसून येणार आहेत. या तिन्ही स्टार किड्ससोबत मिहिर आहुजा, डॉट, युवराज मेंडा आणि वेदांग रैना मुख्य भूमिकेत असणार आहेत. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सुहाना, खुशी अन् अगस्त्या या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. पोस्टरमध्ये तिघेही वेगळय़ा अवतारात दिसून येत आहेत. हा चित्रपट द आर्चीज कॉमिकचे चित्रपटातील रुपांतरण आहे. टीझरमध्ये आर्चीज आणि त्याच्या गँगदरम्यान मैत्रीबंध दिसून येत आहे. चित्रपटात अगस्त्या आर्चीची भूमिका साकारत आहे. तर खुशी ही बैटी तर सुहाना वर्निकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी नेटफ्लिक्सवर दिसून येईल.
अमिताभ बच्चनने नातू अगस्त्य नंदाच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सुहाना खानने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला, तर तिची मैत्री शनाया कपूर आणि अनन्या पांडेने त्यावर कॉमेंट केली आहे. तसेच शाहरुखनेही सुहानाला शुभेच्छा दिल्या आहेत.