नवी दिल्ली
यामाहा मोटारने आपली फ्लॅगशिप 155 सीसी सुपरस्पोर्ट मोटरसायकल वायझेडएफ-आर15एमची वर्ल्ड जीपी 60 वी आवृत्ती सादर केली आहे. या दुचाकीला स्टाईलिश बनवले असून सदरची गाडी आयकॉनिक व्हाईट आणि रेड स्पीड ब्लॉक कलर स्कीमसोबत सादर करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सदरच्या मॉडेलची सुरुवातीची किमत 1,88,300 रुपये राहणार आहे.
दुचाकीमधील सदरची आवृत्ती ही 1961 पासून मोटारसायकल रोड रेसिंगसाठी विशेष आहे. सध्या कंपनीने हे मॉडेल गोल्डन अलॉय व्हील, गोल्डन टय़ुनिंग फोर्क एंब्लेम, ब्लॅक लीव्हर आणि फ्यूल टँकवर विशेष बॅज दिला आहे.
155 सीसी दमदार इंजिन
कंपनीने या मॉडेलला 155 सीसी 4 स्ट्रोक, लिक्विड कूल्ड, एचओएचसी, 4 वॉल्व इंजिन दिले आहे.