नवी दिल्ली
ऍपलने आपल्या वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (डब्लूडब्लूडीसी) या परिषदेत आपले दोन नवीन एम2 चिपसोबत दोन लॅपटॉप व मॅकबुक इयर (2022) व मॅकबुक प्रो यांचे सादरीकरण केले आहे. यामध्ये कंपनीने पहिल्या सिलिकॉन चिप एमआय 2020 मध्ये सादरीकरण केले होते. आताच्या परिषदेत त्याचे पुढील व्हर्जन बाजारात आणले आहे.
सदच्या चिपच्या वापरामुळे संगणकातील सीपीयु आणि जीपीयु यांचे काम पहिल्यापेक्षा वेगवान पद्धतीने कार्यरत राहणार असल्याची माहिती आहे. भारतात मॅकबुकचे नवीन मॉडेलही आगामी पहिल्यांदा उपलब्ध होणार आहे. साधारणपणे मॅकबुक इयर (2022) यांची सुरुवातीची किमत ही जवळपास 1 लाख 20 हजार आणि मॅकबुक प्रो (2022) ची किमत ही 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत राहणार असल्याची माहिती आहे.
मॅकबुक पहिल्यापेक्षा वेगवान
ऍपलने पहिल्या एम1 सिलिकॉन चिप 2020 मध्ये बाजारात सादर केली होती. मात्र आता त्यापुढील मॉडेल बाजारात आणले आहे. यामध्ये ऍपलने एम1 चिपच्या तुलनेत एम2 चिपसेट सर्वाधिक शक्तीशाली राहणार आहे. मॅकबुक इयर (2022) मध्ये सीपीयूची कामगिरी 18 टक्के आणि जीपीयूची कामगिरी ही 35 टक्क्यांनी अधिक कार्यरत राहणार आहे. एम1 चिपच्या तुलनेत एम2 चिपचा वेग सीपीयू 1.9 आणि जीपीयू 2.3 पट अधिक वेगवान राहणार आहे.
मॅकबुक इयर (2022) 13.6 इंच लिक्विड रेटिना डिस्प्लेतून लॅस होणार तर डिस्प्लेचा आकार वाढविला आहे. ऍपल मॅकबुक इयर (2022) मध्ये 2टीबी पर्यंत एसएसडी स्टोरेज आणि 24 जीबीपर्यंत रॅम मिळणार आहे. लॅपटॉपमध्ये 1080 पी क्षमतेचा कॅमेरा राहणार आहे. यामध्ये जुने मॉडेल 720पी होते.
मजबूत बॅटरी बॅकअप
ऍपल मॅकबुक इयर(2022) या मॉडेलमध्ये मजबूत असा बॅटरी बॅकअप मिळणार आहे. यामध्ये तब्बल 20 तास इतक्या कालावधीपर्यंत चालणारी बॅटरी उपलब्ध होणार असल्याचेही ऍपलने स्पष्ट केले आहे.
ऍपलची आयओएस16 प्रणाली सादर
ऍपलने आपल्या डब्लूडब्लूडीसीö2022च्या जागतिक परिषदेत आपली ऑपरेटिंग सिस्टम नवीन अपडेट केली असून यामध्ये आयओएस16 यांचे सादरीकरण केले आहे. नवीन अपडेट करण्यात आलेल्या प्रणालीमध्ये ऍपलने सर्वात मोठा बदल म्हणजे लॉक स्क्रीनची सुविधा दिली आहे. यामध्ये ग्राहकांना मल्टीलेयर्ड कस्टमायजेशनचा पर्याय देणार आहे. उपलब्ध माहितीनुसार आयओएस16 ही प्रणाली आयफोन 14 सोबत सप्टेंबरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. आयओएस-16 आयफोन 7 नंतर असणारे मॉडेल या प्रणालीमुळे अपडेट होणार असल्याची माहिती आहे.
एका चार्जवर 20 तासांपर्यंत मिळणार बॅटरी बॅकअप
किमती 1.2 लाख रुपयांपासून सुरु
डब्लूडब्लूडीसी परिषदेत विविध उत्पादने सादर