ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान शिवाजी पार्कमध्ये अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी मनसे नेते अमेय खोपकर यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर संशय व्यक्त करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना खोपकर म्हणाले, संदीप देशपांडे सातत्याने मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. त्यामुळे त्यांचे विरोधक वाढत आहेत. त्यांच्याकडून असे हल्ले होत असावेत. देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आम्हाला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर संशय आहे. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी करावी. चौकशीत काही तथ्य निघालं तर त्यांना अटक करावी.
दरम्यान, संदीप देशपांडे हा गप्प बसणारा माणूस नाही. मुंबई पोलीस आणि प्रशासनाने त्यांना योग्य ती सुरक्षा पुरवावी. आजच्या भ्याड हल्ल्याचे उत्तर नक्की मिळेल. पाठीमागून हल्ले करायचे नाहीत. मर्द असाल तर पुढे या, असेही खोपकर यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला; मॉर्निंग वॉकदरम्यान घडली घटना