Tarun Bharat

‘बुडा’च्या भ्रष्टाचाराची चौकशी करा

Advertisements

आम आदमी पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

केपीएससी व पोलीस उपनिरीक्षक नियुक्ती प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र व प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. सरकारने या भ्रष्टाचाराची चौकशी करून भ्रष्टाचारात बुडालेले अधिकारी व सदस्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. बुडामध्ये भूखंड विक्रीत झालेल्या भ्रष्टाचाराचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

शुक्रवारी आम आदमी पक्षाचे उत्तर कर्नाटक विभागप्रमुख राजकुमार टोपण्णावर, जिल्हाध्यक्ष विजय पाटील, संघटना सचिव शंकर हेगडे आदींसह नेते, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांनी हे निवेदन स्वीकारले.

केपीएससीमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या सदस्यांना हाकलून नव्याने नियुक्ती करावी. भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, बुडामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. होळीच्या दिवशी 91 भूखंडांचा लिलाव करण्यात आला. या लिलावासंबंधी अधिकारी माहिती देत नाहीत. भूखंडांचा लिलाव व विक्रीतील भ्रष्टाचाराची कसून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

Related Stories

तळघरातील व्यावसायिकांकडून दुप्पट दंड

Amit Kulkarni

वेफोरायझरच्या 125 यंत्रांचे निलजी येथे वितरण

Amit Kulkarni

अनगोळ मुख्य रस्त्यावर अडकले अवजड वाहन

Amit Kulkarni

महालक्ष्मी ओटी भरणे कार्यक्रम मजगावात उत्साहात

Amit Kulkarni

पूरग्रस्तांच्या भावनांशी प्रशासनाचा खेळ

Patil_p

बेळगाव ग्लॅडीएटर संघाकडे सीगन चषक

Omkar B
error: Content is protected !!